टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वातखाली चांगली कामगिरी केली. आता भारतीय संघाने लक्ष हे 9 सप्टेंबरपासून सूरु होणाऱ्या आशिया कप 2025 वर आहे. अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याआधीच भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज आकाश दीप दुखापतीमुळे दुलीफ ट्रॅफितून बाहेर पडला आहे.
आकाश डीपने इंग्लंड दौऱ्यात शानदार गोलंदाजी केली आहे. तसेच त्याने या दरम्यान बॅटने धावा देखील काढल्या आहेत. आकाश दीपला इंग्लंड दौऱ्यातील ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्रास जाणवू लागला होता. या कारणामुळे आता आकाश दीप दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. आकाश दीप दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इस्ट झोनच्या संघाचा भाग होता. इस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा ईशान किशन याच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
हेही वाचा : रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज
इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहला देखील दुखापत झाली होती. त्यानंतर आता आकाशला दुखापतीने घेरले आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी भारताच्या महत्वाच्या खेळाडूंना दुखापत होणे भातीय संघासाठी चांगले संकेत नाही.
आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात आकाश दीपच्या नाव सामोर आले नव्हते. मात्र आता त्याच्या दुखापतीमुळे आकाश दीप आशिया कपमधून बाहेरच पडला आहे. त्यामुळे आता आकाशला त्याच्या फिटनेसवर अधिक काम करावं लागणार आहे. जेणेकरून आगामी स्पर्धांसाठी त्याला संघाचसाठी योगदान देता येईल. आकाश दीप जर वेळेत फिट झाला तर मात्र त्याला घराच्या मैदानावर होणाऱ्या वेस्ट विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान मिळू शकते. भारतीय संघ आशिया कपनंतर मायदेशात विंडीज विरुद्ध २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान २ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारताचा स्टार गोलंदाज आकाश दीपने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केली आहे. त्याने 5 पैकी एकूण 3 सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली. आकाश दीपने या ३ सामन्यांमध्ये १३ बळी मिळवले. तसेच आकाशने पाचव्या कसोटी सामन्यात ओव्हल मैदानावर अर्धशतकासह एकूण 80 धावा फटकावल्या होत्या.