Asian Champions Trophy 2024 : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीचे दोन्ही सामने निश्चित झाले आहेत. 2011 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे, यजमान चीनने प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला. पाकिस्तानला शूटआऊटमध्ये पराभूत करून चीनने मोठी नाराजी ओढवून घेतली. भारताने चीनला हरवून स्पर्धेची सुरुवात केली. हरमनप्रीत सिंगच्या संघाने आतापर्यंत सर्व 6 सामने जिंकले आहेत. चीनला 6 सामन्यांत तीन पराभव पत्करावे लागले आहेत. भारतीय संघ मंगळवारी होणाऱ्या अंतिम फेरीत विजयाचा प्रबळ दावेदार असला तरी चीनला हलक्यात घ्यायचे नाही.
भारतीय हाॅकी संघाची अंतिम फेरीत धडक
Day 7 Results from the 14th Hockey India Junior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/3EMxVYx2cn— Hockey India (@TheHockeyIndia) September 16, 2024
भारत आणि चीन यांच्यातील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी आतील मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील हुलुनबुर शहरात खेळवला जाईल.
भारत विरुद्ध चीन आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध चीन आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 अंतिम सामना IST दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलचे थेट प्रक्षेपण तुम्ही कुठे पाहू शकता?
तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?
भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
दोन्ही संघ असे आहेत
भारत : कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित, राज कुमार पाल, नीलकंता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद राहिल मुसीन , अभिषेक , सुखजित सिंग , अरिजित सिंग हुंडल , उत्तम सिंग , गुरज्योत सिंग.
चीन : आओ वेइबाओ, आओ यांग, चाओ जियामिंग, चेन बेनहाई, चेन चोंगकाँग, चेन किजुन, डेंग जिंगवेन, ई कैमिन, ई वेनहुई, गाओ जिशेंग, हे योंगुआ, हुआंग जियांग, लिन चांगलियांग, लू युआनलिन, मेंग दिहाओ, मेंग नान वांग कायू, वांग वेइहाओ, झांग ताओझू, झू झियाओटोंग.