आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ : टेबल टेनिसमध्ये भारताची सर्वात मोठी आशा मानिका बत्राने पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मनिका बत्राने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मनिकाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना अवघ्या ६ गेमने जिंकला. नेमबाजीत भारताने आणखी दोन पदके जिंकली आहेत. पलकने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगने रौप्य पदक जिंकले. कांस्यपदक पाकिस्तानला मिळाले. भारतीय संघाने ५० मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या स्वप्नील, ऐश्वर्या तोमर आणि अखिल या त्रिकुटाने सुवर्णपदक पटकावले आहे.
टेनिसमध्ये भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे. मिश्र दुहेरीत टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहन बोपण्णाने वयाच्या ४३ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. स्टार महिला बॉक्सर निखत जरीनने २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. स्क्वॉश महिला सांघिक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, पराभवानंतरही भारताला कांस्यपदकावर कब्जा करण्यात यश आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस भारतासाठी चांगलाच गेला आहे.
स्टार महिला बॉक्सर निखत जरीनने २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. निखतने महिलांच्या ४५-५० किलो वजनी बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. निखतने आता उपांत्य फेरी गाठली आहे. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाची चमक कायम आहे. पूल-अ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा वाईट पद्धतीने पराभव केला. या विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे.