अँडरसन फिलिप(फोटो-सोशल मीडिया)
Aus vs WI : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा डे-नाईट कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला २२५ धावांवर रोखलं. या डावात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. ज्यामूळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिजचा अँडरसन फिलिपने एक चमत्कारिक झेल टिपला आहे. फिलिपने मिड-ऑफवर हवेत सूर मारत कॅच पकडला आहे. हा व्हिडिओ सद्या खूप वेगाने व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फलंदाजी करत असताना, जस्टिन ग्रेव्हज वेस्ट इंडिजसाठी ६५ वे षटक टाकायला आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, ट्रॅव्हिस हेडने मिड-ऑफच्या दिशेने हवेत फटका मारला. तथापि, तो मिड-ऑफवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकापासून काही अंतरावर होता. मिड-ऑफवर उभा असलेला फिलिप वेगाने येत त्याने उजवीकडे धावत डाईव्ह मारला आणि चमत्कारिक असावा असा झेल टिपला. या उत्तम झेलचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.
या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. आतापर्यंत खेळलेल्या ५ डावांमध्ये या फलंदाजांना केवळ एकदाच ३०० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ३१० धावा केल्या होत्या. या मालिकेत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूपच त्रास देण्यात आला आहे.
या मालिकेत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांकडूनशानदार कामगिरीचे प्रदर्शन होताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज शमार जोसेफने शानदार कामगिरी करत ५ डावात १८ बळी टिपले आहेत. त्याच्यानंतर जेडेन सील्सनेही चांगली गोलंदाजी करून १३ बळी घेतले. तथापि, त्यानंतरही वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकण्यात अपयशी ठरला.
Anderson PHILLIP…HOW!?🤯#WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/WaZxSoCU1v
— Windies Cricket (@windiescricket) July 13, 2025
हेही वाचा : Photo : केएल राहुलचा जलवा कायम! भारताच्या सलामीवीरापुढे इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज किस झाड कि पत्ती?
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आहे. येथे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठी कामगिरीत करत इतिहास रचला आहे. आता तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटीतील महान गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. स्टार्कने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपला १०० वा सामना खेळत आहे. यासह, तो ग्लेन मॅकग्ग्रानंतर सर्वाधिक कसोटी खेळणारा दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज बनला आहे. स्टार्कपूर्वी हा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर जमा होता.