फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ देखील घोषित करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्यांचे स्थान पक्के केले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने लंडनमधील लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकीट बुक केले आहे फायनलमध्ये स्थान पक्के करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ आहे. आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना झाला यामध्ये ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने २०२३ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल देखील खेळली आणि अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव केला. त्याचबरोबर नवीन वर्षात सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे.
नवीन वर्ष २०२५ ची सुरुवात भारतासाठी चांगली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये झालेल्या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागला. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माने स्वतःला कर्णधारपद आणि प्लेइंग इलेव्हनपासून संघाबाहेर ठेवण्यात आले होते, यावर त्याने त्याची प्रतिक्रिया देखील दिली आहे. जसप्रीत बुमराहने या सामन्याचे नेतृत्व केले होते, परंतु पहिल्या डावात गोलंदाजी करताना तो जखमी झाला होता. अशा स्थितीत विराट कोहलीने उर्वरित सामन्याचे नेतृत्व केले. भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८१ धावांवर सर्व विकेट गमावल्या. भारताला दुसऱ्या डावात केवळ १५७ धावा करता आल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य मिळाले, जे ऑस्ट्रेलियाने मोठ्या कष्टाने पूर्ण केले.
IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताच्या हाती ऑस्ट्रेलियाने हिसकावली! टीम इंडियाचा मालिकेत पराभव
टीम इंडियाने या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलचे सर्व सामने खेळले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे अजून दोन सामने बाकी आहेत. भारतीय संघाने हा सामना जिंकला असता तर निश्चितच अंतिम फेरीच्या शर्यतीत उतरले असते, पण आता कोणत्याही संघासाठी हे समीकरण राहिलेले नाही. भारताच्या संघाला या सामन्यात पराभवानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी दोन संघासाठी दरवाजे उघडले आहेत. यामध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाना फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५ ची फायनल आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ६६.६७ टक्के विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियाने ६३.७३ टक्के विजयासह विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्याचे आयोजन सलग तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये करण्यात येणार आहे. यावेळी आयसीसीने यासाठी लंडनच्या लॉर्ड्सची निवड केली आहे, जिथे ११ जूनपासून अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी हे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.