Ramesh Powar (फोटो- ट्विटर/@TheGuruGyanAI)
भारतीय संघाचे माजी फिरकीपटू आणि अनुभवी प्रशिक्षक रमेश पवार बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे मुख्य निवडकर्ता होऊ शकतात. अजित आगरकर यांच्या जागेवर रमेश पवार यांची निवड होऊ शकते. बीसीसीआयचे निवड समितीत येण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. तो कालावधी आता संपला आहे.
क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
मुदत संपल्यानंतर, क्रिकेट सल्लागार समिती (CAC) ने अर्ज केलेल्या प्रमुख ४ ते ५ उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखत फेरीत भारताचे माजी प्रतिभावान सलामीवीर वसीम जाफर, बडोद्याचे माजी खेळाडू कॉनर विलियम्स आणि जॅकब मार्टिन यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या पुरुष निवड समितीच्या मुख्य निवडकर्ता या पदासाठी रमेश पोवार यांचे नाव चर्चेत आहे. माजी गोलंदाज रमेश पोवार यांचा क्रिकेट आणि कोचिंगमधील प्रवास अत्यंत यशस्वी आणि शानदार राहिला आहे. खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून यश मिळवण्यापर्यंत त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. च्याच मार्गदर्शनखाली आणि धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने २०२१ मध्ये ‘विजय हजारे ट्रॉफी’ चे विजेतेपद पटकावले होते.
Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत बीसीसीआयने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याची निवड समितीच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रज्ञान ओझा याच्याकडे असलेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.






