नवी दिल्ली : भारतात क्रिकेट (Cricket) हा धर्म मानला जातो. कारण देशात सर्वांधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. क्रिकेटचे सामने म्हणजे क्रिकेटप्रेंमीसाठी (Cricket fan) पर्वणी असते. त्यातच मोठी स्पर्धा किंवा विश्वचषक असेल तर क्रिकेट शौकिन सुट्टी टाकून क्रिकेट पाहण्याची मजा घेतात. पुढील वर्षा देशात आयसीसी क्रिके वर्ल्डकप स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) होणार आहे. मात्र या स्पर्धेवर काहीसे कराचे संकट आले आहे. देशात मागील काही दिवसांपासून जनता महागाईंन (inflation) त्रस्त आहे, आता ही महागाई जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतातील बीसीसीआयच्या (BCCI) दरात येऊन पोहचली आहे. त्यामुळं क्रीडा क्षेत्रातील कर (Sports Tax) वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये आली असून, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली असून, चर्चांना उधाण आले आहे.
[read_also content=”नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार https://www.navarashtra.com/india/sonia-gandhi-will-appear-before-the-ed-today-in-the-national-herald-case-nrgm-306390.html”]
दरम्यान, वर्ल्ड कप 2023 मधून एकूण 4000 कोटी महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार जवळपास 800 कोटींचा कर बीसीसीआयला सरकारला द्यावा लागणार आहे. अर्थमंत्रालयाने क्रीडा स्पर्धांवरील कर वाढवून तो 21 टक्के इतका केला आहे. आणि त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेसाठी BCCIला 21 टक्के कर भरावा लागणार आहे. हा कर 10 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांवर गेल्याने BCCI ला आता ICC कडून मिळणाऱ्या एकूण महसुलातील 800 कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे. या कारणांमुळं देशात वर्ल्डकपवर प्रश्नचिन्ह आले असून, अन्य देशात वर्ल्डकप हलविण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळं क्रिकेटप्रेंमीमध्ये नाराजी असून, चर्चांना उधाण आले आहे.