विराट कोहलीची 2023 मधील आकडेवारी : विराट कोहली 2019 ते 2022 दरम्यान त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा, पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही, पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आधी पेक्षाही जास्त धोकादायक होतो.
असाच काहीसा प्रकार विराट कोहलीच्या बाबतीत घडला आहे. 2022 च्या टी 20 आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्यानंतर त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढल्या. 2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी अतिशय संस्मरणीय वर्ष होते, या वर्षी विराट कोहलीने 2000 हून अधिक धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकात सर्वाधिक धावा यासह अनेक खास विक्रम केले आहेत. 2023 मध्ये विराट कोहलीने केलेल्या विक्रमांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विराट कोहलीने 2023 मध्ये एकूण 36 डाव खेळले आहेत. या 36 डावांमध्ये कोहलीने एकूण 2048 धावा केल्या आहेत. या काळात कोहलीची सरासरी 66.06 राहिली आहे. 2023 मध्ये विराट कोहलीने एकूण 8 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. याशिवाय विराट कोहलीने IPL 2023 मध्ये शुभमन गिलनंतर सर्वाधिक 639 धावा केल्या आहेत. 2023 च्या विश्वचषकातही विराट कोहलीने 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या, ज्यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यासाठी विराट कोहलीला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कपचा किताबही मिळाला.