फोटो सौजन्य : X (Royal Challengers Bengaluru)
RCB Ban : आयपीएल 2025 चा 18 वा सीजन समाप्त झाला आहे या सीझनमध्ये अनेक नव्या संघांना त्याचबरोबर नव्या खेळाडूंना लाईमलाईट मिळाली. अनेक युवा खेळाडू रातरात स्टार झाले. त्याचबरोबर 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने म्हणजेच आरसीबीने बंगळुरूमध्ये सेलिब्रेशनच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये अनेकांना अटक करण्यात आले आहे. आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.
रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघाने अठरा वर्षानंतर इंडियन प्रीमियर लीग 2025 चे जेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये आरसीबीच्या खेळाडूंची परेड काढण्यात आली होती. त्याचबरोबर एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. पण आरसीबीच्या चाहत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा जीव गेला. त्याचबरोबर 33 हून अधिक जण हे जखमी झाले होते.
सध्या चेंगराचेंगरी प्रकरणांवर इन्वेस्टीगेशन सुरू आहे, आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहे की आरसीबीला एक वर्षाचा म्हणजेच आयपीएल 2026 मध्ये त्यांना खेळता येणार नाही. सोशल मीडियावर एका आयपीएल एक्स पेजने सांगितले आहे की, राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला १ वर्ष बॅन करण्यात येणार आहे. Tata IPL 2025 Commentary (X पेज) वर शेअर केले आहे की, आरसीबीवर एक वर्षाची बंदी, बेंगळुरू चेंगराचेंगरीत सुरक्षा त्रुटींसाठी जबाबदार आढळल्यास आरसीबीला आयपीएल २०२६ मधून बंदी घालण्याची शक्यता आहे. अधिकारी या घटनेची गांभीर्याने चौकशी करत आहेत असे त्यानी सांगितले आहे.
🚨One year ban for RCB 🚨 RCB may face a ban from IPL 2026 if found responsible for safety lapses in the Bengaluru stampede. Authorities are investigating the incident seriously. pic.twitter.com/kp14K7ThiW — Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) June 8, 2025
एनआयच्या माहितीनुसार विराट कोहलीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. चेंगराचेंगरी 4 जून रोजी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमसमोर झाली होती जिथे आरसीबी संघाच्या विजयाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले. साोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात मोठा वाद सुरु आहे. आरसीबीच्या बॅन संदर्भात अजुनपर्यत आयपीएलने म्हणजेच बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.