पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा ३ गडी राखून पराभव करत मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कसोटी मालिकेतील विजयासह ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही कसोटी गमावल्यामुळे न्यूझीलंडने मालिका 2-0 ने गमावली.
वास्तविक, टीम इंडिया 74 गुणांसह WTC पॉइंट्स टेबल 2024 मध्ये अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकून भारताने पहिले स्थान मिळवले आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.51 आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी मालिकेत न्यूझीलंड (NZ vs AUS) 2-0 ने पराभूत करून, कांगारू संघ तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला. कांगारू संघाचे ९० गुण आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे, ज्याने 60 टक्के सामने जिंकले होते, मात्र आता संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड संघाच्या विजयाची टक्केवारी थेट 60 ते 50 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. बांगलादेशचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याची विजयाची टक्केवारी फक्त 50 आहे. पाकिस्तान संघ २२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाची विजयाची टक्केवारी 36 आहे.