काय घडलं नेमकं?
पीडित मुलगी 16 वर्षांची अल्पवयीन असून ती 9 वीत शिकत होती. तर आरोपी हा पीडितेच्या शेजारी राहत होता. रात्री उशिरा त्याने प्रेयसीच्या घरात घुसून तिची हत्या केली. घटनेच्या वेळी, तरुणीचे कुटुंबीय गाढ झोपेत होते आणि त्यांना याबाबत काहीच कळलं नाही. घरातील जिन्यावर पीडितेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. माहिती मिळताच, परिसरातील लोकसुद्धा घरात गोळा झाले. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला.
प्रेयसीच्या हत्येनंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपी स्वत: हातात पिस्तूल घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केलं. आरोपीची चौकशी केली असता आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला आणि त्यामुळे तिची हत्या केल्याचं त्याने कबुल केलं. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आहे.
सर, प्लीज गेट उघडा..,फक्त १० मिनिटांचा उशीर आणि बोर्डाची परीक्षा हुकली; विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी
बिहार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत पोहोचायला १० मिनिट उशीर झाल्याने परीक्षा हुकली. विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून संपवले जीवन. ही घटना पाटण्यातील मसौढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजचक गावातील आहे. मृत विद्याथीनीचे नाव कोमल कुमारी असे आहे.
विनवणी केली पण…
परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर गेट बंद असल्याचं पाहून कोमलने गेट वाजवण्यास सुरुवात केली. कोमल वारंवार विनवणी करत होती, सर, प्लीज गेट उघडा, परीक्षा ९:३० वाजता सुरू होणार आहे. मला फक्त १० मिनिटे उशीर झाला आहे. अजून २० मिनिटं शिल्लक आहेत. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मात्र, तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही गेट न उघडल्याने ती निराश झाली.
Delhi Crime: ‘बाबा मला वाचवा’… मुलाला वाचवायला धावलेल्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या; दिल्लीतील घटना
Ans: 16 वर्षांची, 9 वीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी.
Ans: प्रेयसीने प्रेमात धोका दिल्याचा संशय.
Ans: प्रेयसीची हत्या करून स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.






