Womens Cricket world cup 2025
“आज आपण कुठे चाललो आहोत? आपण चाललो आहोत आयुष्यातील त्या क्षणांना कैद करायला, ज्याचं स्वप्न बालपणापासून पाहिलं होतं,” — या शब्दांत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराने HARMANPREET KAUR आपल्या भावना व्यक्त केल्या.
ट्रॉफी हाती घेतल्यानंतर तिने सांगितलं, “मला वाटतं हेच ते स्वप्न होतं, ज्याच्यासाठी मी वर्षानुवर्षं मेहनत घेत होती. आज तो दिवस अखेर आला आहे आणि मी अतिशय उत्साहित आहे. माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे, कारण लहानपणापासून वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं आणि आता मला माझ्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.”
CAPTAIN HARMANPREET KAUR AT THE GATEWAY OF INDIA. 🇮🇳pic.twitter.com/UmnsWZuU9x — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2025
ती पुढे म्हणाली, “मी ज्या गोष्टी मनापासून मागितल्या, त्या देवाने एकएक करून पूर्ण केल्या. आज सगळं काही जादूसारखं वाटतंय. सगळं काही योग्य ठिकाणी बसतंय.”2017 च्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतरच्या आठवणींनाही तिने उजाळा दिला. “तेव्हा आम्ही फक्त नऊ धावांनी हरलो होतो आणि मन पूर्णपणे खचलं होतं. पण जेव्हा आम्ही भारतात परतलो, तेव्हा जनतेने आम्हाला दिलेलं प्रेम आणि प्रोत्साहन पाहून जाणवलं की हा फक्त आमचाच प्रवास नाही, तर संपूर्ण देशाचं स्वप्न आहे,” असं ती म्हणाली.
तिने सांगितलं, “या विजयामागे संपूर्ण देश आहे, मैदानावर असलेले चाहते, टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक, सगळ्यांच्या प्रार्थना आणि आशिर्वाद मिळूनच हा विजय शक्य झाला.”बालपणीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, “माझ्या पप्पांच्या किट बॅगमधला मोठा बॅट तेव्हा माझ्यासाठी खूप खास होता. पप्पांनी तो कापून छोटा करून मला दिला आणि त्या दिवसापासून मी खेळायला सुरुवात केली. तेव्हा महिला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हती, पण स्वप्न मात्र एकच होतं — एक दिवस ‘ब्लू जर्सी’ घालायची आणि देशासाठी खेळायचं.”
ती शेवटी म्हणाली, “हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ती छोटी मुलगी, जिला माहिती नव्हतं की महिला क्रिकेट असतं तरी काय, तिचं हे स्वप्न आज पूर्ण झालं आहे. म्हणूनच मी सांगते, स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका. विश्वास ठेवा, कधी, कसं होईल माहीत नाही; फक्त हे होईल, यावर विश्वास ठेवा.”






