आयपीएल 2024 ची गुणतालिका : काल इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या संडे स्पेशल मध्ये दोन सामने पाहायला मिळाले. यामध्ये पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर काल आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
चेन्नईने हैदराबादसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण पुन्हा एकदा सनरायझर्स आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती करताना दिसला. तिला 200 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, त्यामुळे चेन्नईने 78 धावांनी सामना जिंकला. हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गुणतालिकेमध्ये मोठी झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. IPL 2024 च्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरले आहेत. पाच संघ 10 गुणांवर अडकल्याने गोष्टी आता मनोरंजक होत आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने पाच विजय मिळवले आहेत.
यामध्ये राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थानच्या संघाने आतापर्यत 9 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी 8 सामने जिंकले आहेत. त्यानंतर पुढील पाच संघ 10 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स, तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्स, चौथ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद, पाचव्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स तर सहाव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सने कब्जा केला आहे.
गुजरात टायटन्सने आतापर्यत 10 सामने खेळले आहेत यामध्ये ते फक्त 4 सामने जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. गुजरात टायटन्स 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू हे अनुक्रमे आठव्या नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहे.