फोटो सौजन्य - Social Media
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पेठचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख रमेश गायकवाड, माजी सभापती आकाश शिरसाट, ज्येष्ठ पंच राजेश दूधगम गोटू, नंदकिशोर सुलताने, कृष्णा मेतकर, अजय पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
लिलावादरम्यान फलंदाजी, गोलंदाजी आणि ऑलराऊंड क्षमतेच्या आधारे संघमालकांनी खेळाडूंवर जोरदार बोली लावत चतुर रणनीती आखली. अनेक नवोदित क्रिकेटपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त किमती मिळाल्या, तर काही अनुभवी खेळाडूंनादेखील संघांनी प्राधान्य देत स्क्वॉड मजबूत केला. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या या लीगमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
लीगचे सामने जिमखाना क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून मैदान, लाइव्ह स्कोअरिंग, अंपायरिंग आणि तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे आयोजकांनी सांगितले. दर्जेदार सामने, चुरशीची टक्कर आणि रोमांचक क्षण यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
१४ नामांकित संघांची स्पर्धा
या लीगमध्ये ‘अ’ गटात द मास्टर, मंगलमूर्ती, उमरी योद्धा, मनीष टायटन्स, नॅशनल एबी स्पोर्ट्स, एकता, टर्मिनेटर हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात एएसके, एटीएस, ऑरेंज आर्मी, तुळजाई टायगर्स, अनोखा इलेव्हन, अंबिका, वेस्ट अकोला या संघांचा समावेश आहे. लिग पद्धतीनंतर उपांत्य फेरी, सेमी फायनल आणि अंतिम सामन्यातून विजेता निश्चित केला जाणार आहे.
ऑक्शनच्या यशस्वीतेसाठी प्रशांत दामले, संग्राम कांबळे, दीपक शुक्ला, निखिल क्षीरसागर, नंदकिशोर सुलताने, यांसह सर्व संघप्रतिनिधींचा उत्साह उल्लेखनीय होता. तर संपूर्ण आयोजनात हरगोविंद सिंग रोहेल, मयूर निकम, प्रवीण अंभोरे, कावळे, यादव, वानखेडे यांनी सक्रिय योगदान दिले. छत्रपती प्रीमियर लीगमुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय पातळीवर जाण्याचे नवे दार उघडत असून स्थानिक क्रीडा चळवळीला मोठी चालना मिळत आहे.






