विराट कोहली आणि करण जोहर(फोटो-सोशल मीडिया)
Karan Johar’s statement about Virat Kohli on KWK : विराट कोहली हा भारताचा वलयांकित क्रिकेटपटू आहे. टो नेहमी चर्चेत असतो. आता देखील तो करण जोहरमुळे चर्चेत आला. चित्रपट निर्माता करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो, “कॉफी विथ करण”, नेहमीच त्याच्या धाडसी प्रश्नांमुळे आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतो. त्याच्या शोमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दलची मोठ मोठी गुपिते उघड केली आहेत. त्याच वेळी, पाहुण्यांची विधाने अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते. आता, करण जोहरने विराट कोहलीबाबत बोलताना स्वतः एक खुलासा केला आहे की तो पुन्हा कधी देखील शोमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला आमंत्रित करणार नाही. त्याने असे का म्हटले आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : अखेरचा टी 20 सामना पावसाने धुतला! भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 ने मालिका विजय
मित्राच्या ग्लॅम स्ट्रीम कार्यक्रमात सानिया मिर्झासोबत झालेल्या अलिकडच्या एका संभाषणादरम्यान, करण जोहरने सांगितले की त्याने विराट कोहलीला कधीही त्याच्या शोमध्ये आमंत्रित केलेले नाही आणि भविष्यात कोणत्या देखील क्रिकेटपटूला आमंत्रित करणार नसल्याचा त्याचा मानस आहे. त्याने स्पष्टपणे हे सांगितले की, “हार्दिक आणि केएल राहुलसोबत जे घडले त्यानंतर, मी एक निर्णय घेतला आहे की कोणताही क्रिकेटपटू पुन्हा या शोचा भाग असणार नाही.”
२०१९ मध्ये, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी “कॉफी विथ करण” च्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. मुलाखतीदरम्यान, हार्दिकने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक आक्षेपार्ह खुलासे देखील केले होते. एका विधानात, हार्दिकने त्याच्या पालकांना सांगितले की त्याने त्याचे कौमार्य गमावले आहे. या एका विधानानंतर, त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा : IND A vs SA W : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी, ध्रुव जुरेलने दाखवला दम! झळकवली सलग दोन शतके
हे प्रकरण यावरच थांबले नाही, बीसीसीआयकडून दोन्ही खेळाडूंना तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. हार्दिक आणि राहुल यांनी नंतर जाहीरपणे याबाबत माफी देखील मागितली होती, परंतु वाद सुरूच राहिला. हा मुद्दा वाढत जात आहे हे पाहून, करण जोहरने यावर भाष्य केले होते आणि या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तो म्हणाला की, “हा माझा शो होता आणि मी त्याला पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, म्हणून जे काही घडले ते पूर्णपणे माझी जबाबदारी आहे.”असे जोहरम्हणाला होता.






