बर्मिंगहॅम: भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा सामना ९ धावांनी जिंकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदक मिळालं. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. ताहलिया मॅकग्राची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही ऑस्ट्रेलियाकडून तिला क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वीच ताहलिया मॅकग्राची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं आयसीसीला तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती दिली. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशेन आरएसीईजीनं तिला अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला कोणत्याही परस्थितीत सुवर्णपदक गमवायचं नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळं त्यांनी एका पॉझिटिव्ह खेळाडूचा संघात समावेश करून सर्वांसाठी धोका पत्कारला.






