सौजन्य - dk00019 klrahul RCB चे मार्गदर्शक दिनेश कार्तिकचे विराट कोहली आणि केएल राहुलवर मोठे विधान
RCB Mentor Dinesh Karthik On KL Rahul : IPL 2025 पूर्वी, केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग असू शकतात असे जोरदार वृत्त आहे. आयपीएल 2024 मध्ये राहुल लखनऊ सुपर जायंट्सची जबाबदारी सांभाळताना दिसला होता. राहुल 2022 पासून लखनौचा भाग आहे आणि संघाचे नेतृत्व करत आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये राहुल आणि फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून राहुल लखनौ सोडणार असल्याचा दावा केला जात होता. दरम्यान, आरसीबीचे मार्गदर्शक दिनेश कार्तिकने राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणतोय दिनेश कार्तिक पाहा
Dinesh Karthik – " I want @imVkohli to win the IPL trophy first. If there is @klrahul in the team, it is even better ". Even RCB mentor giving signs that RCB will go for Kl Rahul in auction .#KLRahul at @RCBTweets is on the cards … And almost done ✅ pic.twitter.com/7X8J42HBzS — Ecuberin (@harsh_hpt) October 11, 2024
दिनेश कार्तिकने गेल्यावर्षी घेतली निवृत्ती
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळलेल्या दिनेश कार्तिकने हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेतली. यानंतर आरसीबीने त्याला संघाचा मार्गदर्शक बनवले. क्रिकबझवर, आरसीबी मार्गदर्शक कार्तिकला विचारण्यात आले की विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाने प्रथम आयपीएल ट्रॉफी जिंकली पाहिजे?
विराट कोहली हा माझ्या संघाचा एक भाग
या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिक म्हणाला, “विराट कोहली हा माझ्या संघाचा एक भाग आहे. विराट कोहली पहिल्यांदा ट्रॉफी जिंकेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” कार्तिक पुढे म्हणाला, “केएल राहुल जर संघात असेल तर बरं होईल.”
कार्तिकच्या या उत्तराने लोकांच्या मनात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे की IPL 2025 मध्ये राहुल लखनौ सोडून त्याच्या जुन्या फ्रँचायझी RCB साठी खेळताना दिसतो. मात्र, राहुलबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
केएल राहुलची आतापर्यंतची कारकीर्द
आरसीबीकडून आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या केएल राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत १३२ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 123 डावांमध्ये त्याने 45.46 च्या सरासरीने आणि 134.60 च्या स्ट्राईक रेटने 4683 धावा केल्या आहेत. या कालावधीत राहुलने 4 शतके आणि 37 अर्धशतके केली आहेत.






