क्रिस्टियानो रोनाल्डो : ३० जून रोजी पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया (Portugal vs Slovenia) हे जर्मनीमध्ये युरो २०२४ (Euro 2024) फेरीच्या १६ व्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये सुरुवातीलाच असे काही घडले की पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडू लागला. तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मात्र, यावेळी क्रिस्टियानो रोनाल्डोचे सहकारी खेळाडू त्याला प्रोत्साहन देताना दिसले. क्रिस्टियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
३० जून रोजी पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया यांच्यामध्ये फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी पोर्तुगालच्या संघाला स्लोव्हेनियाविरुद्ध पेनल्टी मिळाली होती. यावेळी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्लोव्हेनियाविरुद्धच्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची संधी होती. त्यामुळे पोर्तुगाल संघासाठी गोल झाला असता तर ते फायद्याचे झाले असते. अखेरच्या मिनिटांत त्यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो ढसाढसा रडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर निकालासाठी सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, मात्र येथे ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू पाहायला मिळाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक गोल करण्यात यश आले. तसेच पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियाचा ३-० असा पराभव केला. युरो २०२४ च्या १६ व्या फेरीत पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियाचा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. वास्तविक, दोन्ही संघांमधील सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत एकही गोल करता आला नाही, त्यानंतर अतिरिक्त वेळेतही स्कोअर ०-० असा राहिला. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये रोनाल्डो, ब्रुनो फर्नांडिस आणि बर्नार्डो सिल्वा यांनी गोल केले. अशाप्रकारे पोर्तुगालने स्लोव्हेनियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.