फोटो सौजन्य - सोशल मीडिया
क्रिस्टियानो रोनाल्डोने युट्युब चॅनेल : जागतिक स्तरावर यादीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर त्याने इंस्टाग्रामवर सुद्धा त्याचे ६३६ मिलियर फॉलॉयर्स आहेत. इंस्टाग्रामनंतर त्याचे सर्वाधिक फॉलॉयर्स व्यक्ती हा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. त्याचे चाहते जगभरामध्ये आहेत. त्याच्या खेळाला लोक पसंत करतात. क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय पाहायला मिळतो तो बऱ्याचदा त्याच्या परिवारासोबत फोटो शेअर करत असतो. आता नुकतेच त्याने त्याचे युट्युब चॅनेल उघडले आहे, या युट्युब चॅनेलला काही मिनिटांमध्ये दहा लाखांहून अधिक युजर्सने सबस्क्राइब केले आहे. त्यामुळे आता युट्युबवर त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
बुधवारी २१ ऑगस्ट रोजी क्रिस्टियानो रोनाल्डोने सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा केली आहे की, आता प्रतीक्षा संपली आहे माझे @YouTube चॅनल शेवटी आले आहे! सदस्यता घ्या आणि माझ्यासोबत या नवीन प्रवासाला या.” त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यानंतर काही मिनिटांमध्येच १.६९ दशलक्षहून अधिक सबस्क्राइबर चॅनेलवर आले. आजपर्यंत कोणालाही ९० मिनिटांत १० लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स मिळालेले नाहीत. हा एक विक्रम आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोचे काही मिनिटांमध्ये १० दशलक्षहून अधिक सबस्क्राइबर झाल्यानंतर त्याला युट्युबने काही तासांमध्ये गोल्डन प्ले बटन सुद्धा त्याच्या घरी पोहोचवले आहे. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
A present for my family ❤️ Thank you to all the SIUUUbscribers! ➡️ https://t.co/d6RaDnAgEW pic.twitter.com/keWtHU64d7
— Cristiano Ronaldo (@Cristiano) August 21, 2024
रोनाल्डोचे एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर ११२.५ दशलक्ष फॉलोअर्स, फेसबुकवर १७० मिलियन फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर ६३६ मिलियन फॉलोअर्स आहेत. रियल माद्रिद आणि मँचेस्टर युनायटेडकडून खेळणारा रोनाल्डो गुरुवारी अल-रायड विरुद्ध त्याच्या संघाच्या सौदी प्रो लीगच्या सलामीची तयारी करत आहे.