सौदी अरेबिया त्याच्या वेगवेगळ्या कठोर नियमांसाठी ओळखला जातो. इथं नियम मोडणाऱ्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुटका नसते. मात्र, फुटबॉल स्टार आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) याला हा नियम लागू होत नाही बहुधा. त्याच कारण म्हणजे . कारण रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज एकत्र राहतात पण लग्न झालेले नाही.
[read_also content=”विमानात महिलेवर लघवी केल्याप्रकरणी प्रवाशावर कारवाई; आरोपींविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी, चौकशीसाठी दिल्ली पोलीस मुंबईत https://www.navarashtra.com/crime/action-for-urinating-on-woman-in-plane-look-out-notice-issued-against-the-accused-delhi-police-in-mumbai-for-interrogation-nrps-359619.html”]
रोनाल्डोने अलीकडेच सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल-नसर एफसीशी करार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोने हा करार $75 मिलियन (जवळपास 621 कोटी रुपये) मध्ये केला आहे. देशातील फुटबॉलची वाढती लोकप्रियता आणि व्हिजन 2030 पाहून सौदी फुटबॉल क्लब अल-नसर एफसीने एवढी मोठी रक्कम खर्च करून रोनाल्डोला सामील केले आहे. पण या करारामुळे अल-नसर एफसीसाठी काही समस्या निर्माण व्हायला नको. कारण लग्न न करता जोडीदारासोबत एकाच घरात राहणे सौदी कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज दीर्घकाळापासून एकत्र राहत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, रोनाल्डो आणि रॉड्रिग्ज सौदी अरेबियातील कायदा मोडून एकत्र राहण्यास तयार आहेत. मात्र, कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला सौदी अधिकाऱ्यांकडून शिक्षा होण्याची शक्यता नाही.
37 वर्षीय रोनाल्डो अल-नासरसाठी साइन करण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत असे. पण फिफा विश्वचषकापूर्वी जोरदार वादानंतर रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपवला.
स्पॅनिश वृत्तसंस्था ईएफईने दिलेल्या माहितीनुसार, फुटबॉल स्टार रोनाल्डोला जगातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये गणल्या जातो त्यामुळे त्याला शिक्षा होण्याची शक्यता नाही. दोन वेगवेगळ्या सौदी वकिलांचा हवाला देत कायदेशीर व्यावसायिकांनी रोनाल्डोच्या प्रकरणात संबंधित अधिकारी अडकणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सौदीच्या एका वकिलाने सांगितले की, लग्नाशिवाय एकत्र राहणे कायद्यानुसार अजूनही गुन्हा आहे. परंतु अधिकारी आता अशा प्रकरणांमध्ये मवाळ भूमिका घेतात आणि कोणावरही शिक्षा देण्याचे टाळतात.मात्र, गुन्हा घडला तर हे कायदे नक्कीच वापरले जातात.