फोटो सौजन्य: गुगल
CSK vs MI : IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 37 सामने झाले असून 20 वेळा मुंबई इंडियन्सने विजयाची ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला तर चेन्नई सुपर किंग्जने देखील 17 सामन्यांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाचा हा दोन्ही संघाचा पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहते देखील मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. या दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वीच CSK चा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन्ही संघाचा आज पहिलाच सामना रंगणार आहे. या दरम्य़ान CSK संघाचा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने संघातील एका खेळाडूबाबत केलेल्या वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. CSK चा माजी कर्णधार धोनी देखील यावेळी खेळताना दिसणार आहे. दरम्यान धोनीच्या निवृत्तीबाबत ऋतूराजला विचारलं असता त्याने सांगितलं की, धोनी हा संयमी आणि अभ्यासू खेळाडू आहे. धोनी आता 43 वर्षांचा आहे. आता पर्यंतची त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. गेल्या दोन तीन वर्षात CSK संघाने बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे आशा आहे की, धोनी पुढे CSK साठी दमदार खेळी खेळत राहील.
ऋतूराज पुढे असंही म्हणाला की, धोनीचा सराव हा अभ्यासपूर्ण असतो. त्याला जे काही मिळवायचं आहे किंवा संघासाठी कशा पद्धतीने खेळता येईल याचा तो अभ्यास करुन सराव करत असतो. त्याची खेळण्याची जिद्द , त्याची ऊर्जा यामुळे माझ्यासाठी आणि संपूर्ण CSK संघासाठी धोनी आमचा प्रेरणास्थान आहे. शक्य तितके षटकार मारणं, योग्य स्विंग मिळवणं, सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहणं यासाठी त्याचा प्रयत्न सुरु असतो,” त्याची जिद्द आणि चिकाटी आम्हाला कायमच खेळण्य़ाची प्रेरणा देते. आतापर्य़ंत संघात अनेक नविन खेळाडू आले आहेत त्यांनाही तो योग्यरित्या मार्गदर्शन करतो.
ऋतूराजने बोलताना पुढे सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, वयाचा आणि खेळाचा तसा फार काही संबंध येत नाही. सचिन तेंडुलकर देखील 50 वर्षांचा असतानाही ज्या ताकदीने फलंदाजी करत आहे. त्याच ताकदीने धोनी देखील उत्तम फलंदाजी करत आहे. मला वाटते की (धोनीसाठी) अजून बरीच वर्षे बाकी आहेत, आणि त्याने CSK संघासाठी आणखी काही काळ खेळायला पाहिजे. ऋतूराजच्या या वक्तव्य़ावर धोनी आणि CSK च्या चाहत्यांनी समाधान व्य़क्त केलं आहे. चेन्नईच्य़ा चेपॉक स्टेडियमवर आज दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहे. CSK vs MI या दोन्ही संघांचा यंदाचा हा पहिलाच सामना असून कोण बाजी मारणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.