IPL Auction LIVE Dubai players list

    Indian Premier League (IPL) Auction 2024 Live Updates News : अखेर तो दिवस आला आहे ज्याची क्रिकेट चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आयपीएल 2024 चा लिलाव आज 19 डिसेंबरला दुबईमध्ये होत आहे.

    याप्रसंगी ७७ स्थानांसाठी ३३३ क्रिकेटपटू शर्यतीत असणार आहेत. आयपीएल लिलावाच्या इतिहासात २० कोटी रुपयांची बोली अद्याप कोणत्याही खेळाडूवर लागलेली नाही. यंदा २० कोटींचा टप्पा ओलांडणार का, या प्रश्‍नाचे उत्तर आजच मिळेल.

     

    कमिन्सने तोडले आयपीएलचे सर्व रेकॉर्ड! मिशेल ठरला दुसरा सर्वात महागडा किवी खेळाडू
    डेरिल मिशेलसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी रस दाखवला, ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. अखेर चेन्नईने या शर्यतीत सामील होऊन त्याला 14 कोटींना विकत घेतले.