फोटो सौजन्य - IndianPremierLeague
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स पहिल्या डावाचा अहवाल : दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज अरुण जेटली मैदानावर गुजरात टायटन्सशी सुरु आहे. आजचा सामना दिल्लीच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवल्यास संघाच्या आशा जिवंत राहणार आहेत. या सामन्यात नाणेफेक जिकुन गुजरातच्या संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले फलंदाजी करत दिल्लीच्या संघाने 199 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्ससमोर आज दिल्लीचे 200 धावांचे लक्ष्य असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर फाफ डुप्लेसी आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यांनी आजचा सामन्यात दहा चेंडू खेळला आणि फक्त पाच धावा केल्या आणि अर्शद खानने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. अभिषेक कोरेल याने आणखी एकदा संघासाठी महत्त्वाच्या 30 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आजच्या सामन्यात 16 चेंडूमध्ये 25 धावा केल्या यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार मारले आहेत.
Innings Break!
A spectacular 💯 from KL Rahul help #DC set a challenging total 👌#GT‘s crucial chase on the other side ⌛️
Scorecard ▶ https://t.co/4flJtatmxc #TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/bTWUm2wHgW
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
आजच्या सामन्यांमध्ये केएल राहुलच्या खेळीने आजच्या सामनात चाहत्यांचे लक्ष वेधले. या सामन्यात केएल राहुलने ६० मध्ये १०२ धावा केल्या. आजच्या या राहुलच्या खेळीच्या जोरावर संघाने 199 धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टॅब्स याने आजच्या सामन्यात शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना तो फलंदाजी करण्यासाठी आला होता. आजच्या सामन्यात ट्रिस्टन स्टॅब्स याने दहा चेंडू मध्ये २१ धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार मारले.
RR vs PBKS : हेटमायरचा तो विकेट संघाला पडला महागात! पंजाबने राजस्थानला 10 धावांना केलं पराभूत
गुजरात टायटनचा गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर आजचा सामना संघाच्या हाती फक्त तीन विकेट्स लागले. यामध्ये हर्षद खान याने संघाला एक विकेट मिळवून दिला तर प्रसिद्ध कृष्णाने संघासाठी एक विकेटची कमाई केली. साई किशोर यांनी देखील संघाला एक विकेट मिळवून दिला. गुजरातच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर जोस बटलर देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल.