फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Pakistan – ACC Mens Asia Cup Rising Stars 2025 : एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ सध्या कतारमध्ये सुरु आहे. भारताच्या संघाचा पहिला सामना हा यूएईविरुद्ध झाला होता हा सामना भारताच्या संघाने विजय मिळवून दमदार कामगिरी केली होती. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज वैभव सुर्यवंशी याने कमालीची खेळी खेळली होती. त्याने पहिल्याच सामन्यात 144 धावांची खेळी खेळली आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांना धुतलं होते. एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये आज भारत अ आणि पाकिस्तान अ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
या सामन्यात सर्वांचे लक्ष भारत अ संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर असेल. सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त ४२ चेंडूत १४४ धावा केल्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. आता, तो पाकिस्तानविरुद्धही हीच कामगिरी पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात वैभवची प्रभावी कामगिरी महत्त्वाची आहे.
आयपीएल २०२५ पासून वैभव सूर्यवंशीची बॅट शांत राहिलेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघासाठी धावा केल्या आणि नंतर ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले. सूर्यवंशीने २०२५ च्या रणजी ट्रॉफीमध्येही अपवादात्मक कामगिरी केली. एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये त्याने हा फॉर्म कायम ठेवला. म्हणूनच, तो पाकिस्तान अ विरुद्ध चमकदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यातील दमदार कामगिरीमुळे मुख्य संघासाठीचा त्याचा दावा मजबूत होईल. पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरीमुळे सूर्यवंशीला आणखी उंचीवर नेऊ शकते.
We’re into Day 3 and the urgency has kicked in! 😰 Teams need points, fans need drama ~ and today’s serving both 😉#DPWorldAsiaCupRisingStars2025 #ACC pic.twitter.com/ljmpc2LUQr — AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 16, 2025
वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, कर्णधार जितेश शर्मानेही पहिल्या सामन्यात खूप चांगली खेळी केली. जितेशने ३२ चेंडूत ८ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांसह ८३ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार जितेशनेही पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करून मोठ्या सामन्यात स्वतःला सिद्ध करू इच्छित असेल. नमन धीरनेही पहिल्या सामन्यात फलंदाजीने एक छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली. आता तो पाकिस्तानविरुद्धही एक महत्त्वाची खेळी खेळू इच्छित असेल. सलामीवीर प्रियांश आर्य देखील चाहते आणि व्यवस्थापनाच्या नजरेत असेल.






