शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
DC vs GT : आयपीएल २०२५ च्या ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने दिलेले २०० धावांचे टार्गेट गुजरात टायटन्सने साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शानदार खेळाच्या जोरावर सहज पूर्ण करून दिल्लीवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक विक्रम रचला आहे.
शुभमन गिलला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानले जात आहे. ते त्याने सिद्ध करून दाखवले आहे. त्याने आयपीएल २०२५ च्या ६० व्या सामन्यात दिल्लीविरुद्ध दिसून आले, जेव्हा गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत गिलने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याच्या बाबतीत शुभमन गिलने आता दिग्गज कोहलीला देखील मागे सोडले आहे. गिलने १५४ डावांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोहलीने १६७ डावांमध्ये टी-२० मध्ये ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने केवळ १४३ डावांमध्ये ५००० टी-२० धावा पूर्ण करण्याचा भीम पराक्रम केला होता.
त्याच वेळी, एकूण टी-२० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने टी-२० मध्ये १३२ डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. गिल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.
Discipline in the details 💙 pic.twitter.com/hTOQLaP5RG
— Shubman Gill (@ShubmanGill) May 18, 2025
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकांत तीन गडी गमावून १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात साई सुदर्शनच्या नाबाद १०८ धावांच्या खेळी आणि गिलच्या नाबाद ९३ धावांच्या खेळीमुळे गुजरात टायटन्सने १० विकेट्सने हा सामना सहज जिंकला. या विजयासह, गुजरात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.