SRH Vs CSK Live Streaming (फोटो- ट्विटर)
चेन्नईने एसआरएचला दिले होते 181 रन्सचे टार्गेट
ट्रेविस हेड पुन्हा एकदा अपयशी
इशान किशनची वादळी खेळी
Tata IPL 2026 CSK Vs SRH Live Updates: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अत्यंत महत्वाचा आणि क्वालिफाय कोण करणार असा सामना पार पडला. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा होता. अखेर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा एसआरएचने 5 विकेट्सने पराभव केला आहे. एसआरचने यंदाच्या हंगामात क्वालिफाय केले आहे. एसआरएच चा यंदाच्या हंगामात क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला आहे. एसआरएच पाठोपाठ गुजरात टायटन्सचा संघ देखील क्वालिफाय झाला आहे. आता केवळ एका जागेसाठी 4 संघांमध्ये चुरस होणार आहे.
एसआरएचची फलंदाजी
सीएसकेने प्रथम फलंदाजी करून एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएचकडून ते पूर्ण करण्यासाठी तूफान फॉर्ममध्ये असलेली जोडी म्हणजेच ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा खेळण्यासाठी मैदानात आले. मात्र ट्रेविस हेडची बॅट आज शांत राहिली तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्मा केवळ 26 रन्स करून आउट झाला.
त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या इशान किशन आणि हेनरी क्लासेनने एसआरएचचा डाव सांभाळला. हेनरी क्लासेनने 47 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. तर इशान किशनने आपला नेहमीच फॉर्म कायम राखला. त्याने शानदार अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डी 11 रन्स करून आउट झाला. इशान किशन 70 रन्सची विजयी खेळी करून आउट झाला.
सीएसकेची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. मुकेश चौधरीने ट्रेविस हेडला आउट केले. त्यापाठोपाठ अभिषेक शर्माची महत्वाची विकेट अकील हुसेनने पटकावली. नूर अहमदने हेनरी क्लासेनला आउट केले.
Absorb the pressure. Rebuild the innings. Counter-attack 👊 A phenomenal fifty under pressure by Ishan Kishan 👏 Updates ▶️ https://t.co/4SxAzYKEvY#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvSRH pic.twitter.com/R4itqjqW0Z — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2026
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा आणि पुढील उर्वरित एक सामना चेन्नईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानात खेळण्यासाठी उतरले. मात्र संजू सॅमसन या आजच्या महत्वाच्या सामन्यात फार टिकाव धरू शकला नाही. तो केवळ 27 रन्स करून आउट झाला. डेवाल्ड ब्रेव्हिसने सीएसकेसाठी महत्वाची खेळी केली. तो 44 रन्स करून आउट झाला. शिवम दुबेने 26 रन्सची खेळी केली.
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कमीत कमी रन देत चेन्नईच्या महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. कर्णधार पॅट कमिन्सने तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले. त्याने संजू सॅमसन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माला आउट केले. साकीब हुसेनने उर्वील पटेलला आउट केले. एशान मलिंगाने ब्रेव्हीसला आउट केले. साकीब हुसेनने दुबेला आउट केले.
चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद.
SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन






