मुंबई इंडियन्स(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी स्तगित करण्यात आलेले आयपीएल २०२५ आता पुन्हा १७ मे पासून सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. त्यानंतर ही लीग पुन्हा खेळवली जाणार आहे. तथापि, या लीगमध्ये आता फारसे स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. मुंबई इंडियन्स संघाला देखील बरेच स्टार खेळाडू दिसणार नाहीत.
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कर्तव्यामुळे विल जॅक्स आता मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स आता त्याच्या जागी इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टोला संघात समाविष्ट करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. एका वृत्तानुसार, जॉनी बेअरस्टो संघात आता विल जॅक्सच्या जागी खेळणार आहे.
हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्सने रचला इतिहास, असा कारनामा करणारी ठरली पहिली फ्रेंचाइजी
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स जॉनी बेअरस्टोचा समावेश करण्यास तयार आहे. बेअरस्टो नॉकआउट फेरीपासून मुंबईकडून खेळणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. जर इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला एनओसी दिली तर तो प्लेऑफ सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसणर आहे.
विल जॅक्सला या खेळाडूला मुंबई इंडियन्सने ५.२५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. तो सध्या भारतातच आहे. परंतु राष्ट्रीय कर्तव्यामुळे तो प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकणार नाही. त्याने १२ सामन्यांमध्ये ११ सामने खेळले असून या दरम्यान त्याने आपल्या गोलंदाजीद्वारे मुंबईसाठी खूप महत्वाचे योगदान दिले आहे. आता त्याच्या जागी बेअरस्टोचा समावेश केला जाणार आहे.
जॉनी बेअरस्टोने आयपीएलमध्ये एकूण ५० सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने दोन शतके आणि नऊ अर्धशतकांसह १५८९ धावा केल्या आहेत. जर येत्या काळात मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले तर बेअरस्टो सलामीवीर किंवा क्रमांक ३ चा फलंदाज म्हणून खेळू शकतो. त्याच्या संघात समावेशामुळे मुंबई इंडियन्सला रायन रिकेल्टनची जागा प्लेइंग इलेव्हनमध्ये घेता येण्यास मदत होईल.
हेही वाचा : आयपीएल पुन्हा सुरू होण्यापूर्वी 3 संघांनी केले बदल! मयंक यादव बाहेर, कुशल मेंडिसची झाली एंट्री
मुंबई इंडियन्सचा आगामी सामना जो की लीग मधील त्यांचा १३ वा लीग सामना असणार आहे. तो २१ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्यानंतर जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्जशी दोन हात करताना मुंबई इंडियन्स दिसून येईल. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत, एमआयचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहेत आणि हार्दिक पंड्याचा संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.