गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng Tour : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ इग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इग्लंड दौऱ्याला पुढील महिन्यात सुरवात होत आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह काही खेळाडू ६ जून रोजी भारतातून इंग्लंडला जायला रवाना होतील. उर्वरित खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या वचनबद्धतेनुसार जाणार असल्याची माहिती आहे.
एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आह की, ज्या खेळाडूंची मोहीम लीग फेरीत संपणार आहे. ते खेळाडू गंभीरसोबत पुढे निघून जातील. तर इतर खेळाडूंना इंग्लंडला जाण्यापूर्वी थोडा ब्रेक मिळणार आहे, कारण आयपीएलचा अंतिम सामना ३ जून रोजी होणार आहे. त्यानंतर उर्वरित १० किंवा १२ ला इंग्लंडला जाणार आहेत.
हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्सने रचला इतिहास, असा कारनामा करणारी ठरली पहिली फ्रेंचाइजी
भारतीय कसोटी संघ एका नवीन युगात प्रवेश करणार आहे. जिथे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आता पूर्णपणे दीर्घ स्वरूपाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार आहेत. या कसोटी मालिकेपूर्वी, भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या फलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर लवकरच भारतीय कसोटी संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करण्यात येणार आहे. तथापि, बीसीसीआयकडूनन या गोष्टीला अद्याप अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू संघाची धुरा सांभाळेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंचा अनुभव, नेतृत्व आणि फलंदाजीतील योगदान लक्षात घेता, त्यांची जागा घेणे अवघड होणार आहे.
हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians संघात नव्या पाहुण्याची एंट्री! कधी काळी आपल्या बॅटने गाजवला होता पूर्ण IPL हंगाम..
आगामी इंग्लंड दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे. वृत्तानुसार, सपोर्ट स्टाफ सध्या भारतात नसून ते थेट इंग्लंडमध्ये संघात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत अ संघाची घोषणा होण्याची आशा आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झालेल्या बदलामुळे निवड समितीला त्यांच्या योजनांमध्ये बदल करावा लागला.
इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची मालिका २० जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणार आहे. त्यानंतर पुढचा सामना एजबॅस्टन येथे खेळला जाईल. तिसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळली जाईल. चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे आणि पाचवा सामना ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.