फोटो सौजन्य - सोशल मीडिया
डीजे ब्रावो निवृत्त : वेस्ट इंडिज दिग्गज क्रिकेट खेळाडू आणि अफगाणिस्तानचा प्रशिक्षक डीजे ब्रावोने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला २०२१ मध्येच अलविदा केला होता. त्याचबरोबर त्याने मागील वर्षी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक म्हणून दिसला होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघाला सुद्धा प्रशिक्षण देत होता. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तो भावुक होताना दिसला. डीजे ब्रावोने सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याने डोमॅस्टीक क्रिकेटमधून सुद्धा निवृत्तीची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर ब्रावोने पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज मी त्या खेळाला अलविदा म्हणत आहे ज्याने मला वयाच्या पाचव्या वर्षापासून खूप काही दिले आहे. मला माहित होते की मला हेच करायचे आहे. मला हा खेळ खेळण्यासाठी बनवले गेले आहे. मला २१ क्रमांक चांगला माहित आहे.” कारकिर्दीतील वर्षे तो एक अद्भुत प्रवास होता. पुढे तो म्हणाला की, त्याला खेळायचे आहे, परंतु त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. त्याने लिहिले, “मला क्रिकेटशी माझे नाते चालू ठेवायचे आहे. पण सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. माझे मन मला खेळायला सांगत आहे, पण माझे शरीर सहकार्य करत नाही. माझे शरीर आता वेदना सहन करू शकत नाही.”
निवृत्तीची तारीख ब्रावोने सुरुवातीलाच सांगितलं होत की, या हंगामानंतर तो लीगमधून निवृत्त होणार आहे. पण त्याची निवृत्ती लवकर झाली आणि त्याचे कारण होते त्याची दुखापत. मंगळवारी, सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध खेळताना त्रिनबागो नाईट रायडर्सच्या दिग्गजांना कंबरदुखीचा त्रास झाला, त्यानंतर त्याने हंगाम संपण्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. झेल घेताना त्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर ब्राव्होने आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला.