आयुष म्हात्रे(फोटो-सोशल मीडिया)
England Under 19 team vs India Under 19 : भारतीय पुरुष संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसरीकडे अंडर 19 चा संघ देखील इंग्लंडचे मैदान गाजवत आहे.अशातच वैभव सूर्यवंशी सद्या खूप चर्चेत आहे. त्याची बॅट तळपत असल्याचे दिसत आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आता मात्र मुंबईकर आयुष म्हात्रेने देखील आपला जलवा दाखवण्यात कसली कमी ठेवली नाही. टीम इंडियाच्या अंडर 19 चा कर्णधार आयुष म्हात्रेने सूर्यवंशीपेक्षा दोन जास्त सिक्स मारले आणि एक रेसिर्ड बनवला आहे. इतकच नाही, अंडर 19 टेस्ट मॅचमध्ये आयुष म्हात्रेने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार बनला आहे.
वनडे, टी 20 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या सिक्स मारण्यात पटाईत आहे. पण टेस्टमध्ये मात्र आयुष म्हात्रे अंडर 19 क्रिकेटमध्ये वैभवपेक्षा खूप पुढे आहे. इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध भारताची अंडर 19 टीम दोन टेस्ट मॅच खेळली आहे. आयुष म्हात्रे या सीरीजमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा :
आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध 2 यूथ टेस्ट मॅचमध्ये खेळताना एकूण 9 सिक्स ठोकले आहेत. यात 6 सिक्स एकाइनिंगमध्ये मारण्याची किमया केली आहे. 9 सिक्सस लगावून म्हात्रे यूथ टेस्ट सीरीजमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी हा विक्रम सौरभ तिवारीच्या नावावर जमा होता. त्याने 2007-08 सालच्या सीरीजमध्ये 8 सिक्स लगावले होते.
मागीलवर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या यूथ टेस्ट सीरीजमध्ये वैभव सूर्यवंशीनच्या बॅटमधून 7 सिक्स बरसले होते. वैभव सूर्यवंशीला सौरभ तिवारीचा रेकॉर्ड मोडण्यात अपयश आले होते. आता आयुष म्हात्रेने हा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा :
इंग्लंड विरुद्धच्या युवा टेस्ट सीरीजमध्ये आयुष म्हात्रेने केवळ सर्वाधिक षट्कारच मारले नाहीत, तर कर्णधार म्हणून यूथ टेस्ट सीरीजमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा आणि 200 प्लस धावा काढणारा कर्णधार बनला आहे. 18 वर्षाच्या आयुष म्हात्रेने दुसऱ्या युथ टेस्टमध्ये हे यश मिळवले आहे. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 80 आणि दुसऱ्यामध्ये 126 धावा करुन एकूण 206 धावा फटकावल्या आहेत. आयुष म्हात्रेने या बाबतीत 19 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. याआधी हा विक्रम तन्मय श्रीवास्तवच्या नावावर जमा होता. त्याने 2006 साली यूथ टेस्ट सीरीजच्या एका सामन्यात 199 धावा अकधल्या होत्या.