फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारताचा संघ हा इंग्लंडला पोहोचला आहे. शुभमन गिल यांच्या नेतृत्वात भारताचा संघ हा युवा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गेली याच्या हाती भारतीय संघाची कमान देण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन इंग्लंड विरुद्ध काय असणाऱ्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांना स्थान मिळू शकते त्याचबरोबर साई सुदर्शनला देखील या दोघांमधील एकाच जागेवर घेतले जाऊ शकते. तिसऱ्या स्थानावर करून नायर त्याचा नंबर लागू शकतो. तर चौथ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार शुभमन गिल असू शकतो. भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याचा पाचवा नंबर असू शकतो त्यानंतर त्याच्याखाली अष्टपैलू रवींद्र जडेजा हा फलंदाजीला येऊ शकतो.
Australia vs South Africa : पॅट कमिन्स मोडणार बुमराहचा रेकाॅर्ड? WTC Final ठरेल ऐतिहासिक
भारतीय संघासाठी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरची देखील संघामध्ये निवड करण्यात आली होती तो फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करते त्यामुळे त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. आठव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा नंबर लागतो कुलदीप यादव यांनी नुकताच त्याचा साखरपुडा पार पाडला आणि त्यानंतर तो इंग्लंड रवाना झाला आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह याचे नाव अव्वल स्थानावर आहे.
IND vs ENG : भारताच्या संघाला इंग्लंड लायन्सने 348 धावांवर रोखलं! जाणुन घ्या सामन्याचा अहवाल
मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वगळण्यात आले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात बीसीसीआयला ट्रोल केले होते. इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्ससाठी त्याने कमालीची कामगिरी केली होती. या सीजन मधील प्रसिद्ध कृष्णा हा ऑरेंज कॅपचा विजेता ठरला. आयपीएल 2025 मध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतले त्यानंतर त्याला भारतीय संघामध्ये देखील स्थान मिळाले आहे.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा