फोटो सौजन्य - England Cricket
वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा संघ जाहीर : इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडिया पुढील महिन्यामध्ये इंग्लड दौऱ्यावर असणार आहे त्याआधी इंग्लंड क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. १३ मे रोजी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या महत्त्वाच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी हॅरी ब्रूककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याशिवाय, अनेक तरुण खेळाडूंव्यतिरिक्त, वरिष्ठ खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना जागा मिळाली आहे यावर एकदा नजर टाका.
लॉरा वोल्वार्डचे स्थान धोक्यात, स्मृती मानधना फलंदाजांच्या यादीत नंबर वन होण्याच्या जवळ
२०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली, त्यानंतर जोस बटलरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. जोस बटलरच्या जागी हॅरी ब्रुकला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे ब्रूकने इंग्लंड क्रिकेटसाठी अधिक वेळ देऊ इच्छित असल्याने आयपीएल २०२५ मध्ये भाग घेतला नाही. तथापि, याआधी ब्रूकने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Our first men’s white-ball squads of the summer are here! 🧢
The first under captain Brook 🫡
📝 Click below for the full story 👇
— England Cricket (@englandcricket) May 13, 2025
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी जोस बटलर, जो रूट, फिल साल्ट, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर यांसारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळाली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका २९ मे ते ३ जून दरम्यान खेळवली जाईल. यानंतर ६ जूनपासून टी-२० मालिका सुरू होईल. शेवटचा सामना १० जून रोजी खेळवला जाणार आहे.
इंग्लंडचे काही खेळाडू हे आयपीएल २०२५ चा भाग आहेत. यामध्ये जोस बटलरने गुजरात टायटन्ससाठी या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. जोफ्रा आर्चरने सुद्धा पहिल्या सामन्यातील कामगिरी वगळता त्याने दमदार खेळ आयपीएलमध्ये दाखवला आहे.
🏏 Who are you backing to have a BIG summer? 🤔#ENGvWI | #EnglandCricket pic.twitter.com/34NuA4adju
— England Cricket (@englandcricket) May 13, 2025
एकदिवसीय संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ.