फोटो सौजन्य - x सोशल मीडिया
MI vs CSK : आज इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ४० वा सामना लखनौ विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये सामना होणार आहे. आतापर्यत झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेची स्थिती सांगायचे झाले तर सीएसकेचा संघ १० व्या स्थानावर आहे तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ १२ गुणांसह विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ तर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे.
पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२५ मध्ये वाईट स्थिती आहे. २० एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेला मुंबईविरुद्ध ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पॉइंट्स टेबलमध्ये सीएसके देखील शेवटच्या स्थानावर आहे. या वर्षी सीएसकेची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. माजी भारतीय खेळाडू आणि निवडकर्ता श्रीकांत यांनी खराब कामगिरीमुळे आर. अश्विनवर निशाणा साधला आहे. श्रीकांत आर अश्विनच्या कामगिरीवर नाराज आहे.
श्रीकांतने त्याच्या युट्यूब चॅनल चिकी चिका वर म्हटले, अश्विन काय करत आहे? तो पूर्णपणे बचावात्मक बनला आहे. तो विकेट घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. हे असं आहे की, मला फक्त हे चार षटके टाकू द्या. तो कधीही विकेट घेण्यासाठी गेला नाही. फक्त सुरक्षितपणे गोलंदाजी करत होतो. सीएसकेला त्याचा अजिबात फरक पडला नाही. एमआय (मुंबई इंडियन्स) देखील समजूतदारपणे वागत होते, त्यांनी त्याच्याकडून एकेरी घेतल्या. तुम्हाला सामन्याची परिस्थिती, आयपीएलची परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि त्यानुसार गोलंदाजी करावी लागेल.
सीएसकेबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाले की, धोनीने पुढील हंगामाबद्दल बोलणे सुरू केले आहे, यावरून स्पष्ट होते की तो संघाच्या कामगिरीवर खूश नाही. खेळाडूंनी त्यांची चूक मान्य करावी आणि काहीतरी खास करावे असे त्याने बरोबर म्हटले. खरंतर, सीएसकेचा पराभव लिलावापासूनच सुरू झाला. जेव्हा तुम्ही सॅम करन, ओव्हरटन, त्रिपाठी आणि हुडा सारखे खेळाडू निवडता तेव्हा सामना जिंकणे कठीण होते.
आर. अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये निराशा केली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने एकही विकेट घेतलेली नाही. अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही.