गुजरात टायटन्स : आयपीएल २०२५ चा (IPL 2025) नवा सिझन येण्यासाठी वेळ आहे. परंतु त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये मागील दोन वर्षांपासून दमदार कामगिरी करणारा गुजरात टायटन्सचा (Gujrat Taitans) संघ अदानी विकत घेण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती समोर आली आहे. गुजरात टायटन्सच्या संघाची मागील दोन वर्षांमधील कामगिरीवर नजर टाकली तर संघाने पहिल्याच वर्षांमध्ये आयपीएलचे जेतेपदक पटकावले होते. तर २०२३ मध्ये त्यांना अंतिम सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या दोन वर्षांमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने दमदार कामगिरी केली होती.
आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याचे मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्सची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे की, CVC कॅपिटल पार्टनर्स म्हणजेच गुजरात टायटन्सचे मालक अल्पसंख्याक होल्डिंग राखून बहुसंख्य हिस्सा विकण्यास तयार आहेत. यासंदर्भात अदानी समूह आणि टोरेंट समूह आयपीएल संघातील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यासाठी बोलणी चालू आहे अशी माहिती मीडियाच्या माहितीनुसार समोर आली आहे. बीसीसीआयचा लॉक-इन कालावधी जो नवीन संघांना स्टेक विकण्यापासून प्रतिबंधित करतो तो फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे.
असे सांगण्यात येत आहे की, गुजरात टायटन्सच्या संघाने २०२१ मध्ये जेतेपदक मिळवले होते. आणि पुढील हंगामात उपविजेतेपद पटकावले आहे, ज्यामुळे त्यांची एक मौल्यवान संपत्ती आहे. फ्रँचायझीचे तब्बल $1 अब्ज ते $1.5 बिलियन एवढे मूल्य असू शकते असा अंदाज लावला जात आहेत. त्यामुळे आता अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुप या दोघांनी भूतकाळात आयपीएल संघाची मालकी घेण्यास स्वारस्य व्यक्त केले आहे आणि हीच त्यांना क्रिकेटच्या आकर्षक जगात प्रवेश करण्याची संधी असू आहे. तथापि, करार अंतिम झालेला नाही आणि सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.






