यशस्वीने डीआरएस घेतल्यावर बेन स्टोक्स पंचांवर रागावलेला दिसला.(फोटो-सोशल मिडिया)
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर गारद करून १८० धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर, दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने १ विकेट गमावून ६४ धावा करून चांगली सुरवात केली आहे.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला यशस्वी जयस्वाल बाद झाल्याने एकमेव धक्का बसला. दुसऱ्या डावात यशस्वीने आश्वासक सुरवात केली खरी तरी तो त्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. त्याने २२ चेंडूत २८ धावा केल्या. त्याच वेळी, जयस्वालने ज्या चेंडूवर तो बाद झाला होता त्यावरही डीआरएसचे अपील केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स रागावलेला दिसून आला. यादरम्यान, त्याने पंचांशी वाद देखील घातल्याचे दिसून आला.
हेही वाचा : IPL 2026 च्या आधीच संजू सॅमसन मालामाल, बनला सर्वात महागडा खेळाडू! या संघाने पाण्यासारखा ओतला पैसा
जोश टँग इंग्लंडकडून डावातील आठवे षटक टाकत असताना त्यातील चौथा चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यानंतर इंग्लंडकडून जोरदार अपील करण्यात आले आणि पंचांनी जयस्वालला बाद घोषित केले. तथापि, यशस्वीने नॉन-स्ट्राइकवर उभ्या असलेल्या केएल राहुलशी संवाद साधून डीआरएस घेतला. त्यावेळी डीआरएस घेण्यासाठी कोणत्याही संघाला १५ सेकंदात घ्यावा लागतो, पण इथे जयस्वालला डीआरएस घेण्याला थोडा उशीर झाला, जरी पंचांनी वेळेवर लक्ष दिले नाही, म्हणून त्यांनी डीआरएसचा कॉल स्वीकाऋण घेतला, परंतु, हे सर्व पाहून बेन स्टोक्स चांगलाच संतापलेला दिसून आला आणि थेट पंचांकडे आला, कारण पंचांकडून वेळ संपल्यानंतर देखील डीआरएस देण्यात आला.
— BavumaTheKing Temba (@bavumathek83578) July 4, 2025
यानंतर, बेन स्टोक्स पंचांशी वाद घालताना दिसून आला. परंतु, पंचांनी त्याचे काही एक ऐकले नाही. डीआरएस घेतल्यानंतरही यशस्वी जयस्वाल त्याची विकेट बहाल करावी लागली आणि तिसऱ्या पंचांकडून त्याला एलबीडब्ल्यू आउट घोषित करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जेमी स्मिथने सर्वाधिक १८४ धावा फटकावल्या. त्याशिवाय हॅरी ब्रूकने देखील १५८ धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी शानदार गोलंदाजी केली करून अनुक्रमे ६ आणि ४ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : 6 फलंदाज शून्य धावांवर बाद तरीही इंग्लंडने केला विश्वविक्रम! असा रेकाॅर्ड करणारा जगातील पहिला संघ