फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Hardik Pandya takes 200 wickets : वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीने कमालीची फलंदाजी केली तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघासाठी २ विकेट घेतले. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला. वानखेडे स्टेडियमवर पंड्याने एक खास द्विशतक झळकावले आहे. त्याने हे द्विशतक बॅटने नाही तर बॉलने केले. पंड्याने टी-२० मध्ये २०० बळी पूर्ण केले आहेत. त्याने आरसीबीविरुद्ध ही कामगिरी केली पण खूप जास्त धावा दिल्या. पंड्याने त्याच्या चार षटकांत ४५ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.
पंड्याने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात त्याने प्रथम शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला बाद केले. १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नमन धीरच्या गोलंदाजीवर पंड्याने कोहलीला बाद केले. त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंड्याने आरसीबीच्या आणखी एका प्रतिभावान फलंदाजाची विकेट घेतली. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला जसप्रीत बुमराहने झेलबाद केले. लिव्हिंगस्टोन दोन चेंडूंवर खाते न उघडता बाद झाला. या विकेटसह पांड्याने आपले २०० विकेट पूर्ण केले. त्याने २९१ टी-२० सामन्यांमध्ये हे केले.
Hardik Pandya creates history! 🌟 Becomes the first Asian all-rounder to achieve the 200 wickets & 5000 runs in T20s! 🔥🏏 pic.twitter.com/bBaNfM3LZc
— CricketGully (@thecricketgully) April 7, 2025
बुमराहच्या पुनरागमनानंतरही पंड्या आणि त्याचा संघ आरसीबीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच विकेट गमावून २२१ धावा केल्या. विराट कोहलीने ४२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ६७ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली. जितेश शर्माने अखेर १९ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या.
रोहित शर्मा सोफिया हयातसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये? “पहिल्याच भेटीतच किस…”, वाचा नक्की प्रकरण काय
मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर संघाचे आतापर्यत चार सामने झाले आहेत यामध्ये त्यांना १ सामन्यात विजय मिळाला आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघाकडून मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता तर गुजरात टायटन्स त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. मुंबईच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एकमेव विजय नावावर केला आहे.