फोटो सौजन्य - Hockey India सोशल मिडिया
क्रिकेट आशिया कप सुरु व्हायला5 दिवस शिल्लक आहेत, त्याआधी सध्या भारताच्या क्रिडा प्रेमींचे लक्ष हाॅकी आशियाकप लागले आहे. भारताचा संघाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे पण काल झालेल्या भारत विरुद्ध साऊथ कोरीया सामन्यामध्ये सामना अनिर्णयित राहिला. हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर ४ टप्प्यात भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात एक उत्तम सामना झाला. बिहारमधील राजगीर येथे मुसळधार पावसामुळे हा सामना खूप उशिरा सुरू झाला.
दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकायचा होता. त्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपले १०० टक्के योगदान दिले. त्यामुळे सामना अखेर बरोबरीत सुटला आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. लीग टप्प्यात, भारतीय हॉकी संघाने त्यांचे तिन्ही सामने अतिशय आरामात जिंकले होते. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया अधिक मजबूत दिसत होती. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरच्या ७ व्या मिनिटाला टीम इंडियाने पहिला गोल केला.
WARRIOR MENTALITY! 🔥
India strikes back late to draw their opening match of the Super 4s Pool stage against Korea at the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025.
🇮🇳 2-2 🇰🇷#HockeyIndia #IndiaKaGame #HumSeHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/eQBd5EjogL
— Hockey India (@TheHockeyIndia) September 3, 2025
पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हार्दिक सिंगने भारतासाठी शानदार गोल केला. त्याच क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाने बरोबरी साधली. ११ व्या मिनिटाला यांग जिहुनने पेनल्टी स्ट्रोकचा फायदा घेत गोल केला. इतकेच नाही तर पहिल्या क्वार्टरच्या १३ व्या मिनिटाला यांग जिहुनने दुसरा गोलही केला. यासह कोरियाने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. तथापि, दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. तिसरा क्वार्टर संपल्यानंतरही कोरियाचा संघ २-१ ने आघाडीवर होता. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये, ५२ व्या मिनिटाला, माजी कर्णधार मनदीप सिंगने गोल करून टीम इंडियासाठी सामना बरोबरीत आणला. टीम इंडियाला २ पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांना त्यांचा फायदा घेता आला नाही. शेवटच्या ८ मिनिटांत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामना २-२ असा बरोबरीत सुटला.
यासह, भारत आणि कोरियाचे प्रत्येकी १-१ गुण झाले आहेत. सुपर ४ मध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यामध्ये शेवटचे ५ मिनिटे असताना गोल केला आणि भारताचा संघ पराभवापासून सुरक्षित राहिला. भारताचा पुढील सामना हा मलेशिया विरुद्ध होणार आहे. हा सामना आज 7.30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे.