फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पृथ्वी शॉची इंस्टाग्राम स्टोरी : भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा अलीकडचा काळ चांगला जात नाही. त्याला अनेक टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. काहीजण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर काहीजण त्याच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर तो सातत्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याला त्यात यश आलेले नाही. त्याचबरोबर त्याला इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे ऑक्शन झाले यामध्ये सुद्धा त्याला कोणत्याही फ्रॅन्चायझीनी विकत घेतले नाही.
आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूला लाथ पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत शॉ मुंबई संघाचा भाग होता पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीमुळे त्याची निवड झाली नाही. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉवर एक विधान केले, ज्यावर पृथ्वी शॉने पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना पृथ्वी शॉने लिहिले की, “जर तुम्हाला याबद्दल पूर्णपणे माहिती नसेल, तर त्याबद्दल बोलू नका.” बरेच लोक अर्धवट तथ्यांसह गृहितक करतात.
याआधी, एमसीएच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आम्ही १० क्षेत्ररक्षकांसह खेळत होतो कारण आम्हाला पृथ्वी शॉला लपवायला लावले होते. चेंडू त्याच्या जवळून गेला आणि तो क्वचितच पकडू शकला. फलंदाजी करत असतानाही तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, हे आपण पाहत होतो. त्याचा फिटनेस, शिस्त आणि वृत्ती वाईट आहे. वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम असू शकत नाहीत ही अगदी सोपी गोष्ट आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूही आता त्याच्या या वृत्तीबद्दल तक्रारी करू लागले आहेत.
After Prithvi shaw’s story, MCA Source Said “The fitness concern is there, but the performance is also not there currently. Prithvi Shaw needs to work on his fitness, discipline, and performance. The main issue is the fitness“ (HT)pic.twitter.com/GBLBDhpfuT
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) December 19, 2024
पृथ्वी बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. याशिवाय आता त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही धक्के बसत असल्याचे दिसत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शॉची कामगिरी काही खास नव्हती. त्यामुळे त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघात स्थान मिळाले नाही. त्याआधी पृथ्वी शॉने देखील आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आपले नाव दिले होते, मूळ किंमत केवळ 75 लाख रुपये असूनही या खेळाडूला खरेदीदार सापडला नाही.