सोफी डेव्हाईन आणि हरमनप्रीत कौर(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 मध्ये आज 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यायाधी न्यूझीलंड महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आजचा हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता सुरू होईल.
आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण, दोन्ही संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी त्यांचे उपांत्य फेरीमधील आपले स्थान निश्चित केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या स्थानासाठी आज लढत होणार आहे. भारतीय संघाने त्यांचे मागील सामने गमावले आहेत. आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी बहरतीय महिला संघ केवळ २ सामने जिंकू शकला आहे. आधी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडयांच्याकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौर आर्मीला हा सामना जिंकणे खूपच गरजेचे आहे. अन्यथा उपात्य फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंग पावेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आतापर्यंत ५७ वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने ३४ सामन्यात विजय मिळवला आहे तर भारतीय संघाने २२ सामने आपल्या नावे केले आहे. यामधील एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांमधील सामने नेहमीच अटीतटी चे राहिले आहेत आणि यावेळी देखील चाहत्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटची मेजवानी मिळेल असे बोलले जात आहे.
न्यूझीलंड महिला संघ संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ब्री एलिंग, एडन कार्सन, ली ताहुहू, हन्ना रो, पॉली इंग्लिस आणि बेला जेम्स.
भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, अरविंद रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि युवती.