मुंबईच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश; तर संघाची धुरा सूर्याकडे, दुखापतीमुळे रोहितची विश्रांती
आज आयपीएलच्या १६ हंगामातील २२ सामना मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात सुरू असताना, मुंबई संघात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने आज संघाबाहेर असल्याने सूर्याकडे टीमची जबाबदारी आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा समावेश केला आहे
मुंबई : आज आयपीएलमधील १६ व्या हंगामातील २२ सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात सुरू असताना, महत्त्वाचे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या ताफ्यात नवीन खेळाडूंचा समावेश झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा दुखापतीने बाहेर असणार आहे. सूर्याकडे संघाची जबाबदारी असणार आहे.
मुंबई संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे आज संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आजचा सामना खेळणार नाही. वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी मुंबईच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. सूर्युकमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे.