सौजन्य - BCCI टीम इंडियाचे जोरदार कमबॅक; सलामी जोडीची शानदार सुरुवात, कांगारूंची त्यांच्याच घरात काढली इज्जत
IND vs AUS 1st Test : घरच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी धावसंख्या: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार खेळीने कांगारूंची इज्जत काढली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 150 धावांवर गारद झाला. यानंतर ऑस्ट्रेलिया फलंदाजीला उतरली, परंतु ऑस्ट्रेलिया अवघ्या 104 धावांवर ऑलआऊट झाली.
भारतीय संघाची शानदार सुरुवात
त्यानंतर भारतीय संघाची सलामी जोडी फलंदाजीला उतरली त्यांनी शानदार खेळी करीत पहिल्या विकेटसाठी 171 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. काल आणि आज भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा घाम काढला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने शानदार भागीदारी करीत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. टीम इंडिया 218 धावांनी लीडने आहे.
कर्णधार बुमराहची अद्भूत करामत
कर्णधार जसप्रीत बुमराहने काल जे केले ते अद्भूत होते. यामध्ये त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकल्याचे अनेकांनी सांगितले. परंतु, स्वतः कॅप्टनने हा निर्णय योग्य करून दाखवला. यामध्ये जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. यानंतर मोहम्मद सिराज 2 विकेट घेतल्या. तर हर्षित राणाने 3 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांमध्ये होणार कसोटी मालिका
दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला. हा सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे वर्चस्व होते. पण भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहसमोर कांगारू काही करू शकले नाहीत. पहिल्या डावात बुमराहने एकट्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 104 धावांवर ऑलआऊट झाला. 43 वर्षांनंतर घरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बुमराहसमोर नतमस्तक
जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 30 धावांत 5 बळी घेतले. बुमराहने कसोटी कारकिर्दीत 11व्यांदा 5 बळी घेतले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या डावात 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ६७/७ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. बुमराहने ॲलेक्स कॅरीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दिवसाचा पहिला धक्का दिला.
तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश
बुमराहने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश केला होता. ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडली असली तरी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही अंतिम-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. 69 वर्षांनंतर भारतीय संघात तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. यापूर्वी 1955 मध्ये ढाका येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हे दिसून आले होते जेव्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विजय मांजरेकर, नरेन ताम्हाणे आणि माधव मंत्री यांचा समावेश करण्यात आला होता.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच्या वादग्रस्त निर्णयाची भरपाई
भारताचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने हिरव्या रंगाच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच्या आपल्या वादग्रस्त निर्णयाची भरपाई केली आणि सुरुवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली, ज्याच्या मदतीने फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिली कसोटी जिंकली. आयपीएलच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी झालेल्या सामन्यात 67 धावांवर सात विकेट्स घेऊन पुनरागमन केले. हा सामना खराब फॉर्ममध्ये असलेल्या दोन्ही संघांच्या फलंदाजांमधील लढत मानला जात होता आणि पहिल्या दिवशी 17 विकेट्सच्या घसरणीत याचे प्रतिबिंब दिसून आले.
बुमराहने घेतले सर्वाधिक बळी
विकेटवर गवत असूनही बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण या विकेटने गोलंदाजांना सीम आणि अतिरिक्त उसळी दिली. भारताच्या युवा आणि अनुभवी फलंदाजांना यजमान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीने केलेल्या 41 धावा आणि ऋषभ पंतच्या 37 धावा याशिवाय भारताच्या डावात कोणालाच महत्त्वाचे योगदान देता आले नाही. भारतीय संघ 49.4 षटकात 150 धावांवर बाद झाला. मिचेल स्टार्कने 11 षटकात 14 धावा देऊन दोन विकेट घेतल्या तर जोश हेझलवूडने 13 षटकात 29 धावा देत 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने 15.4 षटकात 67 धावा देत दोन गडी बाद केले.
घरच्या मैदानावर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या
83 धावा, मेलबर्न, 1981
104 धावा, पर्थ, 2024
107 धावा, सिडनी, 1947
131 धावा, सिडनी, 1978
145 धावा, ॲडलेड, 1992
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या
83 धावा, मेलबर्न, 1981
91 धावा, नागपूर, 2023
93 धावा, वानखेडे, 2004
104 धावा, पर्थ, 2024
105 धावा, कानपूर, 1959
हर्षित राणाचे धमाकेदार पदार्पण
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणानेही चांगली कामगिरी केली. त्याने 3 बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावावर अधिक दबाव आणला. राणाने नॅथन लियॉन आणि मिचेल स्टार्कचे महत्त्वाचे बळी घेतले. स्टार्क (२६) आणि जोश हेझलवूड (७*) यांच्यातील शेवटच्या विकेटची भागीदारी मोडून त्याने भारतीय संघाला दिलासा दिला.