सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने २-१ असा विजय मिळवला आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला २९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे, ज्याने अलीकडेच आशिया कप जिंकून आपले कर्णधारपद सिद्ध करून दाखवले आहे. तथापि, त्याच्या वैयक्तिक फलंदाजीच्या फॉर्मची देखील तपासणी सुरू आहे. सूर्या बऱ्याच काळापासून मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि म्हणूनच आता या मालिकेत सूर्यकुमार कसा खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा : ICC Ranking : Smriti Mandhana ची ‘दहशत’ कायम! प्रतीका रावलनेही घातला धुमाकूळ..
टी २० मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने स्पष्टपणे उत्तरे दिले आहेत. यावरून असे दिसते की, त्याला त्याच्या फॉर्मबद्दल कोणती देखील चिंता नाही. त्याने सांगितले की तो नियमितपणे सराव करत आहे आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी नेहमीच मेहनत घेत आहे. माझे घरगुती सत्र खूप चांगले होते आणि येथेही काही सत्रांमध्ये मला चांगले वाटले आहे. मी योग्य दिशेने वाटचाल करत असून हेच सर्वात महत्त्वाचे आहे. धावा स्वाभाविकपणे येणार, परंतु संघाचे ध्येय हेच नेहमीच प्राधान्य असेल.” त्याच्या आत्मविश्वासावरून स्पष्ट दिसत आहे की, तो टीकेला महत्व देत नाही आणि त्याचा त्याला परिणाम होत नाही. परंतु मैदानावर त्याच्या बॅटने उत्तर देण्यासाठी तो आता पूर्णपणे सज्ज आहे.
२०२५ सूर्यासाठी कामी आले नाही, परंतु त्याचा आत्मविश्वास खूप अबाधित राहिल्याचे दिसून आले. २०२५ हे वर्ष सूर्यासाठी बॅटने विशेषतः प्रभावी ठरू शकले नाही. त्याने आतापर्यंत ११ टी-२० डावांमध्ये फक्त १०० धावा केल्या आहेत, जे त्याच्या क्षमतेच्या फलंदाजासाठी खूपच निराशाजनक आहे. तथापि, आयपीएलमधील त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर तो पुन्हा फॉर्म मिळवू शकेल अशी अपेक्षा आहे. संघ व्यवस्थापन देखील त्याच्या पाठीमागे आहे. कारण कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड प्रभावी राहिला आहे.
ऑस्ट्रेलियन परिस्थिती नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे. परंतु सूर्यासारख्या आक्रमक फलंदाजासाठी ती एक संधी देखील निर्माण करणारी आहे. टीकेचे लक्ष्य ठरलेल्या सूर्या आता त्याच्या बॅटने उत्तर देऊ इच्छित आहे, जे कोणत्याही विधानापेक्षा अधिक प्रभावी असेल.






