स्मृती मानधना आणि प्रतिका रावल(फोटो-सोशल मीडिया)
स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध १०९ धावा काढल्या होत्या, त्यानंतर तिने बांगलादेशविरुद्ध नाबाद ३४ धावा केल्या. मानधना ८२८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेली अॅश गार्डनर (७३१) तिच्यापेक्षा ९७ गुणांनी पिछाडीवर आहे. प्रतीका रावलने १२ स्थानांनी मोठी झेप घेऊन ५६४ रेटिंगसह २७ वे स्थान पटकावले आहे, परंतु आता दुखापतीमुळे ती स्पर्धेतील उर्वरित सामन्यांपासून मुकली आहे.
भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाला सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी महिला खेळाडू ऑफ द मंथ म्हणून देखील सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने दोन स्थानांनी झेप घेऊन तिसऱ्या स्थान काबिज केले आहे. तिने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध ९० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१ धावा करून आपली क्षमता सिद्ध केली.
दरम्यान, इंग्लंडची एमी जोन्सने टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे, चार स्थानांनी झेप घेऊन तिने नवव्या स्थान (६५६) गाठले आहे. अॅनाबेल सदरलँडने टॉप ४० मध्ये सर्वात मोठी झेप घेतली आहे, ती १६ स्थानांनी झेप घेऊन १६ व्या स्थानावर येऊन पोहोचली आहे.
महिला गोलंदाजांच्या क्रमवारीत सोफी एक्लेस्टोन (७४७) अव्वल स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज अलाना किंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ धावांत ७ बळी टिपून पाच स्थानांनी मोठी झेप घेऊन दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तिची सहकारी अॅश गार्डनरची एका स्थानाने घसरण होऊन तिसऱ्या स्थानी पोहचली आहे.
दरम्यान, पाकिस्तानची नाशरा संधू डावखुरी ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज नोनकुलुलेको म्लाबा (६१०) सोबत संयुक्तपणे १० वे स्थान पटलावले आहे. वेगवान गोलंदाज मॅरिझाने कॅप आणि अॅनाबेल सदरलँड यांनीही एका स्थानाचा फायदा होऊन अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानावर उडी घेतली आहे.






