 
        
        फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज दुसरा सामना आज मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना मालिकेचा दुसरा सामना आहे, पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिला विकेट गमावल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली होती पण सामन्याचा निकाल आला नाही. आजच्या सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अर्शदीप सिंग याला भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये आजही स्थान मिळाले नाही. त्याने मागील काही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे पण हर्षित राणामुळे त्याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती या दोघांना मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संघामध्ये स्थान मिळाले आहे. तर शिवम दुबे, अक्षर पटेल यांना अष्टपैलू यांच्या भुमिकेत संघामध्ये स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाजामध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा हे दोघे खेळताना दिसतील.
2nd T20I India XI: A. Sharma, S. Gill, S. Yadav (c), T. Varma, S. Samson (wk), S. Dube, A. Patel, H. Rana, K. Yadav, V. Chakaravarthy, J. Bumrah. https://t.co/7LOFHGtfXe #TeamIndia #AUSvIND #2ndT20I — BCCI (@BCCI) October 31, 2025
मागील सामन्यामध्ये अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली होती पण तो खेळी मोठी खेळण्यात अपयशी ठरला. तर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव हा मागील सामन्यामध्ये चांगल्या लयीमध्ये पाहायला मिळाला, आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. पावसामुळे सामन्यात अनेक वेळा व्यत्यय आला, ज्यामुळे शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. चाहत्यांसाठी वाईट बातमी अशी आहे की दुसरा T20 सामना देखील पावसाच्या सावलीत आहे. असे मानले जाते की चाहत्यांना ४० षटकांचा रोमांचक सामना पाहण्याची शक्यता नाही.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.






