भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
India’s record at Adelaide Oval : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS)यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. भारताला यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मात्र शुभमन गिल आणि त्याची टीम या मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असणार आहे. हा सामना देखील महत्त्वाचा आहे कारण जर भारताने हा सामना गमावला तर भारताला मालिका गमावावी लागेल. आकडेवारीवरुन दिसून येते की हा सामना भारताच्या बाजूने आहे.
हेही वाचा : IND vs AUS : अॅडलेडमध्ये ‘या’ पाच खेळाडूंनी फटकावल्या सर्वाधिक धावा! वाचा खेळाडूंची यादी
अॅडलेड ओव्हल येथे भारताची कामगिरी
अॅडलेड ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १५ सामने खेळवले गेले आहेत. या १५ पैकी ९ सामने भारताने आपल्या खिशात टाकले आहेत. अॅडलेड ओव्हल येथे भारताचा विजयाचा टक्का ६०.०० इतका आहे. भारताने या मैदानावर फक्त ५ सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण ५४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यापैकी ३७ जिंकले आहेत तर १७ गमावले आहेत. अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयाचा टक्का ६८.५१ आहे.
अॅडलेड ओव्हलवर सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पहिले नाव महेंद्रसिंग धोनीचे आहे. धोनीने सहा सामन्यांमध्ये १३१.०० च्या सरासरीने २६२ धावा फटकावल्या आहेत. धोनी या मैदानात चार वेळा नाबाद राहिला आहे. या मैदानावर धोनीने तीन अर्धशतके देखील झळकवले आहेत. दरम्यान, विराट कोहलीने चार सामन्यांमध्ये ६१.०० च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या मैदानावर दोन शतके झळकवली आहेत, यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०७ आहे. या मैदानावर परदेशी फलंदाजाकडून सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या इंग्लंडच्या माजी फलंदाज ग्रॅमी हिकसोबत कोहलीचा देखील समावेश आहे.
हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
या मैदानावर भारताची सर्वोच्च धावसंख्या ७ बाद ३०० आहे. भारताने २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता. अॅडलेडमधील सर्वाधिक धावसंख्या ७ बाद ३६९ आहे, जी ऑस्ट्रेलियाने २६ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरुद्ध उभारली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याट आतापर्यंत १५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ५८ सामने जिंकले आहेत आणि ८५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा विजयाचा टक्का ४०.५५ इतका राहिला आहे.