Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला परवडेना? १८ नोव्हेंबरनंतर योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ladki Bahin Yojana News in Marathi : नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसला आहे. पण सोशल मीडियावरील या व्हायरल मेसेज मागचं सत्य काही औरच आहे.
सध्या लाडक्या बहिणी योजने दीड कोटींपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. यातील काही खोटे लाभार्थी देखील आहे. यामुळे सध्या सर्व अर्जांची पडताळणी सुरु आहे. यासाठी E-KYC करण्यास सांगण्यात आले आहे. पण सोशल मीडियावर केला जात असलेल्या दाव्यानुसार, खरंच लाडकी बहिण योजना बंद होणार आहे का?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, १८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. सरकारला लाडक्या बहिणींचा खर्च परवडत नसल्याने ही योजना बंद केली जाणार आहे. या व्हायरल मेसेजमुळे लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. मुख्यत: ग्रामीण भागातील अनेक बहिणींना अद्याप लाडक्या बहिणीचे अनुदान मिळालेले नाही. यामुळे ही योजना बंद झाली असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय अनेक लाडक्या बहिणींची e-KYC झालेली नाही.
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सध्या e-KYC अनिवार्य करण्यात आली असून याची पडताळणी सुरु आहे. यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्याचा वेळ देण्यात आला होता, यासाठी आता केवळ ५ दिवस उरले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC ची प्रक्रिया लाभार्थ्यांना पूर्ण करायची आहे. ज्या महिलांनी e-KYC पूर्ण केलेली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहिल. सध्या काही लाभार्थींना अनुदान मिळालेले नाही. वेबसाईट बदलेली असल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास वेळ लागत आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यावर दिलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुमची e-KYC झाली असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहिल. दरवर्षी जून महिन्यात याची पडताळणी देखील केली जाणार आहे. तसेच सध्या यामध्ये काही बदल केले जात आहेत. ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले असेल, त्यासाठी डेथ सर्टिफिकिट अपलोड करण्यासाठी वेबसाइटमध्ये बदल केला जात आहे. यामुळे अनुदान मिळण्यास उशिर होत आहे. पण योजना बंद झालेली नाही.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…






