फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड चौथा T20 : सामना भारतीय महिला संघाचा चौथा सामना हा 9 जुलै रोजी खेळायला जाणार आहे हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पण तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघांमध्ये चौथा सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवल्यास टीम इंडिया मालिका जिंकेल जर भारताच्या संघाचा या सामन्यात पराभव झाला तर मालिका बरोबरीत येईल आणि दोन्ही संघ 2–2 अशा बरोबरीत असतील. भारत विरुद्ध इंग्लंड महिला t20 मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत या मालिकेचा शेवटचा सामना हा 12 जुलै रोजी खेळवल्या जाणार आहे त्यानंतर भारतीय महिला संघ हा तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहे.
IND vs ENG : वैभव सुर्यवंशीची मेहनत फेल! इंग्लंडने जिंकला शेवटचा सामना, भारताने मालिका ठेवली ताब्यात
चौथ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतीय क्रिकेट चाहत्यांना कुठे आणि कधी पाहताना या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लेखांमध्ये आम्ही देणार आहोत. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघाची t20 मालिकाही 9 जुलै रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे रात्री अकरा वाजता होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना हा टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोनी लिव ॲपवर पाहता येणार आहे. बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच बरोबर वेबसाईटवर या सामन्याच्या स्कोरिंग दाखवले जाणार आहेत.
A train journey full of laughter, fun and music 🎶#TeamIndia enroute Manchester for the 4th T20I against England.#ENGvIND pic.twitter.com/6Xhdpjw9xt — BCCI Women (@BCCIWomen) July 7, 2025
भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे त्यामुळे भारतीय संघाकडे दोन सामन्यांची आघाडी आहे इंग्रजी संघाने सामना जिंकला होता. आता चौथ्या सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवल्यास मालिकेमध्ये बरोबरी होईल त्याचबरोबर भारताच्या संघाने जर या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा संघ मालिका नावावर करेल.
भारतीय संघासाठी हा समार फार महत्त्वाचा असणार आहे पहिल्या दोन सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताच्या संघाला या मालिकेमध्ये विजय मिळवण्यासाठी फक्त एक विजयाची गरज आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिला सामन्यामध्ये स्मृती मानधना हीने संघात नेतृत्व केले होते.






