• नागपूर मध्यवर्ती कारागृहात ३ दिवसीय विभागीय क्रीडास्पर्धेचा शुभारंभ
• ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
• राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्कृष्ट खेळाडूंची पुण्यात निवड होणार
नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे पूर्व विभागातील कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडास्पर्धेला मंगळवार, ३ फेब्रुवारीला उत्साहात प्रारंभ झाला. या ३ दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते सायंकाळी ४.३० वाजता कारागृहाच्या कवायत मैदानावर करण्यात आले.
Nagpur Crime: पेंचमधील वाघाची शिकार अंगलट; ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास
स्पर्धेत नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, मोर्शी आणि गडचिरोली येथील ११ कारागृहांमधील एकूण २२६ अधिकारी व कर्मचारी खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी पोलिस बँडच्या तालावर खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन करीत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली, प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. मार्गदर्शन करताना डॉ. सिंगल यांनी नियमित खेळामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती टिकून राहते, असे सांगितले. कारागृह विभागातील काम तणावपूर्ण असल्याने प्रत्येकाने किमान एक खेळ आत्मसात करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. ३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रस्सीखेच, धावणे, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबठडी, बॅडमिंटन, कराटे आणि कुस्ती आदी क्रीडाप्रकारांचचे आयोजन करण्यात आले.
राज्यस्तरावर होणार निवड
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभास पूर्व विभागातील सर्व कारागृहांचे अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी केले तर अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) तथा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी आभार मानले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
Nagpur Crime: भरदिवसा टाकला दरोडा, समतानगरात खळबळ; गणवेशाच्या टायने बांधले मुलाचे हात-पाय
Ans: नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी उद्घाटन केले.
Ans: कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, धावणे, कुस्ती, बॅडमिंटन, कराटे यांसह विविध मैदानी व क्रीडाप्रकार.
Ans: अधिकारी-कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखणे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणे.






