डेव्हिड लॉरेन्स(फोटो-सोशल मिडिया)
England’s former fast bowler David Lawrence passes away : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाता आहे. अशातच सामन्यादरम्यान इंग्लंडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी छोटी राहिली असली तरी या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला घेतला.
ग्लोस्टरशायर आणि इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षाचे होते. या बातमीने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. लॉरेन्सने त्यांच्या छोट्या पण प्रभावी राहीलेल्या कारकिर्दीत त्याच्या वेग आणि जोशाने सर्वांना प्रभावित केले होते. लॉरेन्सने १९८० आणि १९९० च्या दशकात ग्लोस्टरशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले असून त्यांच्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते. त्यांनी इंग्लंडसाठी पाच कसोटी सामने आणि एक वनडे सामने खेळले आहेत. दुखापतींमुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला खिल बसली तरी, त्यांनी आपल्या प्रभावी उर्जेने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घतले.
हेही वाचा : SL vs BAN सामना पाहण्यासाठी पोहोचला कोब्रा आणि माकड, मैदानावर उडाला गोंधळ, Photo Viral
डेव्हिड लॉरेन्स यांचा जन्म ग्लॉस्टरशायरमध्ये झाला होता. मैदानावर त्याची आक्रमक शैली आणि मैदानाबाहेरचा त्याचा मैत्रीपूर्ण स्वभावासाठी त्यांना ओळखले जात असे. लॉरेन्सच्या कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की डेव्ह लॉरेन्स एमबीई यांचे मोटार न्यूरॉन आजाराशी धैर्याने लढताना निधन झाले आहे. सिड हा क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेर एक प्रेरणादायी व्यक्ती होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कुटुंबाला, जे त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यासोबत होते.’
हेही वाचा : IND vs ENG :’..यासाठी कोणते पदक मिळणार नाही’, टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटूची आगपाखड..
डेव्हिड लॉरेन्स यांनी १९८८ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले होते. तर १९९२ मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला आहे. या काळात त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये १८ बळी मिळवले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर ४ बळी जमा आहेत. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५१५ बळी टिपले आहेत. त्याच वेळी, त्यांनी लिस्ट ए मध्ये १५५ बळी घेतले आहेत.