गौतम गंभीर आणि मायकेल आथर्टन(फोटो-सोशल मिडिया)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. तसेच भारताने याआधी सलग दोन कसोटी मालिका गमावल्या असून त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ३-० असा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून देखील १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. जर भारत इंग्लंड मालिकाही गमावली तर प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
मायकेल आथर्टन पुढे म्हणाले की, “भारत, त्याच्या सर्व संसाधने आणि लोकसंख्या असून देखील, असा संघ नाही ज्याच्याकडे लोकांचा संयम आहे. मैदानावर पाऊल ठेवताच त्यांना जिंकण्याची अपेक्षा असते. त्यामुळे, सलग तीन कसोटी मालिका गमावणे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करणारे ठरू शकते.”
हेही वाचा : आशिया कपपूर्वी या तीन देशांमध्ये होणार ट्राय सिरीज! यूएईमध्ये होणार सामने, वेळापत्रक जाहीर
२०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर गौतम गंभीरकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपदाची धुरादेण्यात आली. गंभीरची टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झालेली आहे. १२ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर भारतीय संघाने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद देखील आपल्या नावे केले आहे. परंतु, कसोटीतील त्यांचा कार्यकाळ आतापर्यंत संधानकर्क असल्याचे दिसत नाही. जर भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर बीसीसीआय निश्चितच दीर्घ स्वरूपात त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
भारत प्लेइंग ११
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
हेही वाचा : ७० वर्षांच्या भारतीय क्रिकेटरची २८ वर्षाची लहान नवरी; वाढदिवशी नवरदेवाला देणार खास सरप्राईज; वाचा सविस्तर..
इंग्लंड प्लेइंग ११
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.






